रविवार, 30 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात आमना सामना झाला. पर्थवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. त्यांचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. नेदरलँड्सविरुद्ध देखील हॅरिसने अशाच गोलंदाजीचे प्रदर्शन केले. नेदरलँड्सचा बास डी लीड याला रौफचा एक चेंडू लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आणि मैदान देखील सोडावे लागले.
नेदरलँड्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या 91 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. बाबरने 5 चेंडूत 4 धावा केल्या आणि विकेट गमावून बसला. टी-20 विश्वचषकात बाबरची बॅट अजूनपर्यंत शांतच दिसली आहे. अशात चाहते त्याच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) मात्र सर्वांचे लक्ष वेधताना दिसला. त्याने या सामन्यात टाकलेल्या तीन षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील घेतली. यादरम्यान, रौफच्या एका चेंडूमुळे बास डी लीड (Bas de Leede) याला डोळ्याखाली चांगलाच मार लागला.
चेंडू लागल्यानंतर डी लीडच्या डोळ्याखालून रक्त आले आणि त्याला टाके देखील टाकावे लागले. हा प्रकार नेदरलँड्सच्या डावातील सहाव्या षटकात घडला. रौफने टाकेलल्या या षटकातील पाचवा चेंडू शॉर्ट होता, जो मारण्याच्या प्रयत्नात बास डी लीडच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली. डी लीड या सामन्यात 16 चेंडू खेळला आणि 6 धावा केल्यानंतर त्याला ही दुखापत झाली. रक्त मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट घोषित केले गेले. रौफने टाकलेला हा चेंडू तसे पाहिले तर फलंदाजाच्या हेलमेटवर लागला होता. पण त्याचे नुकसान मात्र चेहऱ्यापर्यंत पोहोचले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Trending_Vibez/status/1586625415115902978?s=20&t=eCQB1-IBOL-sBN9euvWBXQ
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पाकिस्तानसाठी अष्टपैलू शादाब खान याने सर्वाधिक 4 षटकांमध्ये 22 धावा खर्च करून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद वसीमने 15 धावा खर्च करून 2 विकेट्स नावावर केल्या. रौफप्रमाणेच शाहीन आफ्रीदी आणि नसीम शाह यांनी देकील प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितच्या निशाण्यावर वर्ल्डरेकॉर्ड, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘हा’ विक्रम रचण्याची संधी
बांगलादेशच्या मदतीला पुन्हा धावला शाकिब! ‘त्या’ थ्रोमुळे झिम्बाब्वेचा संघ पराभूत