---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का! रचिन रवींद्र भर मैदानात रक्तबंबाळ

Rachin-Ravindra
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी, पाकिस्तानच्या यजमानपदाखाली न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना शनिवारी (08 फेब्रुवारी) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर लगेचच रचिनच्या तोंडातून रक्त येऊ लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

खरंतर, चेंडू पकडण्याचा प्रयत्न करताना रचिनच्या तोंडाला दुखापत झाली. सामन्याच्या दुसऱ्या डावातील 38 व्या षटकात पाकिस्तानच्या खुसदिल शाहने किवी गोलंदाज मायकेल ब्रेसवेलला स्वीप शॉट मारला. चेंडू थेट रचिन रवींद्रकडे गेला. रचिन झेल घेण्यास उत्सुक होता. पण तो चेंडू जज करु शकला नाही आणि चेंडू थेट त्याच्या तोंडावर लागला.

चेंडू लागल्यानंतर रचिन तिथेच बसला आणि त्याच्या तोंडातून पाण्यासारखे रक्त येऊ लागले. हे पाहून फिजिओ ताबडतोब मैदानावर आला. त्याने रचिनच्या तोंडाला टॉवेल गुंडाळला आणि त्याला मैदानाबाहेर नेले. यानंतर रचिनवर उपचार करण्यात आले.


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने रचिन रवींद्र हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 29 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 25 डावांमध्ये, रचिनने 40.41 च्या सरासरीने 970 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली. याशिवाय, 21 डावांमध्ये गोलंदाजी करताना, रचिनने 18 विकेट्सही घेतल्या आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकांत 300/6 धावा केल्या. यादरम्यान, ग्लेन फिलिप्सने संघाकडून 74 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 106* धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तान लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि 47.5 षटकांत 252 धावांवर सर्वबाद झाला.

हेही वाचा-

न्यूझीलंडचा दणदणीत विजय, पाकिस्तानचा 78 धावांनी दारुण पराभव
ताकद की कमकुवत बाजू? पुल शॉटमुळे रोहित शर्माची कसोटी सुरू!
‘एमआय केपटाऊन’चा सनसनाटी विजय, SA20 ट्रॉफी उंचावत इतिहास रचला!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---