---Advertisement---

न्यूझीलंडचा दणदणीत विजय, पाकिस्तानचा 78 धावांनी दारुण पराभव

---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानी संघाला 78 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पाकिस्तानकडून गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पाकिस्तानला 331 धावांचे लक्ष्य दिले, ज्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानला फक्त 252 धावा करता आल्या. फखर झमानने पाकिस्तानसाठी निश्चितच लढाऊ खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. ग्लेन फिलिप्सच्या शतकाने फखरच्या डावावर सावली टाकली.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. बाबर आझम फक्त 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरीकडे, फखर झमानने दमदार खेळी केली. त्याने 69 चेंडूत 84 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. कामरान गुलाम आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. सलमान अली आघाने काही वेळ विकेटवर राहण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्याने 40 धावा केल्या. अबरार अहमदने 23 धावांची खेळी केली. दुखापतीमुळे हरिस रौफ फलंदाजीला आला नाही. अशाप्रकारे फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

एकेकाळी किवी संघाने फक्त 39 धावांमध्ये दोन विकेट गमावल्या होत्या. पण यानंतर डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. मिशेलने 81 धावा केल्या. तर फिलिप्सने त्याच्या कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्याने 74 चेंडूत 106 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्याशिवाय अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने 58 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळीमुळे न्यूझीलंड संघाला 330 धावांचा टप्पा गाठण्यात यश आले. शाहीन आफ्रिदीविरुद्ध 50 व्या षटकात ग्लेन फिलिप्सने एकूण 25 धावा कुटल्या. तो सामन्यात खूप महागडा ठरला. त्याने 10 षटकांत एकूण 88 धावा दिल्या.

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्राॅफीपू्र्वी संघाला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---