पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सर्व मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून याची अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे स्फोटक फलंदाज फखर जमानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत संधी मिळाली नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही फखर जमान संघाचा भाग नव्हता. बाबर आझमचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. तर वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी अजूनही कसोटी संघाबाहेर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी तोंडावर असताना वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला केवळ वनडे आणि टी20 संघात ठेवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघ – मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, जहानद खान, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, सॅम अयुब, सलमान , शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ – मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सॅम अयुब, सलमान आगा , शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ – शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, हसिबुल्लाह (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मीर हझमा, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक). यष्टिरक्षक), नसीम शाह, नोमान अली, सॅम अयुब आणि सलमान अली आगा.
पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक
10 डिसेंबर- पहिला टी-20
13 डिसेंबर- दुसरा टी20
14 डिसेंबर- तिसरा टी20
17 डिसेंबर- पहिला वनडे
19 डिसेंबर – दुसरा वनडे
22 डिसेंबर- तिसरा वनडे
26 ते 30 डिसेंबर – पहिली कसोटी
3 ते 7 जानेवारी – दुसरी कसोटी
हेही वाचा-
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीपूर्वी WTC गुणतालिकेत पुन्हा फेरबदल, या संघाचा मोठा फायदा
रोहित शर्मा ओपनिंग करेल की सहाव्या क्रमांकावर खेळेल? आकडेवारी काय सांगते?
IND VS AUS; ॲडलेड कसोटीपू्र्वी फलंदाजी स्थितीच्या प्रश्नावर केएल राहुलचे धक्कादायक उत्तर