दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी संघाचा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह आफ्रिकन संघाने मालिका 2-0 ने जिंकली. आफ्रिकेचा संघ आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. या सामन्यात पाकिस्तानने आफ्रिकेला विजयासाठी 58 धावांचे लक्ष्य दिले होते. ज्याचा आफ्रिकेने सहज पाठलाग केला.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने एकही कसोटी न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. आतापर्यंत, बावुमाने 9 कसोटी सामन्यांमध्ये आफ्रिकन संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये संघाने 8 सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. संघाने आपला विजय रथ कायम ठेवला आहे. आता त्यांचे पुढचे पाऊल WTC फायनल जिंकणे असेल. दक्षिण आफ्रिकेने मागील 7 कसोटी सामन्यांमध्ये सलग विजय मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी सामन्यातील सर्वाधिक सलग विजय
मार्च 2002 ते ऑगस्ट 2003 – 9 सामने
ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत – 7 सामने
नोव्हेंबर 2012 ते फेब्रुवारी 2013 – 6 सामने
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 615 धावा केल्या. संघाकडून रायन रिकेल्टन, टेंबा बावुमा आणि काइल वॉरेन यांनी शतके झळकावली. रिकेल्टनने द्विशतक झळकावले. त्याने 259 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बास आणि सलमान अली आगा यांनी 3-3 बळी घेतले. पण या दोघांशिवाय इतर गोलंदाज दयनीय फ्लॉप ठरले.
गोलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर फलंदाजांनाही पाकिस्तानला पहिल्या डावात आपली ताकद दाखवता आली नाही. केवळ बाबर आझमने अर्धशतक झळकावले. त्याने 58 धावा केल्या. पाकिस्तानी संघ पहिल्या डावात 184 धावा करू शकला. यानंतर पाकिस्तानला फॉलोऑन खेळावे लागले. कारण आफ्रिकेला 421 धावांची आघाडी मिळाली होती.
पण दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत 478 धावा केल्या. शान मसूदने शतक झळकावून संघाला 145 धावा केल्या. त्याने बाबर आझम (81 धावा) सोबत सलामी करताना 205 धावांची भागीदारी केली. सलमान अली आगाने 48 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 41 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच पाकिस्तानी संघ डावाचा पराभव टाळू शकला आणि दक्षिण आफ्रिकेला 58 धावांचे लक्ष्य देण्यात यशस्वी ठरला. मात्र आफ्रिकेने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
हेही वाचा-
टेंबा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचे ‘अच्छे दिन’, पाहा कर्णधाराची रेकाॅर्डब्रेक कामगिरी
‘तेल ही गेलं तुप ही गेलं’, बीजीटीच्या पराभवनंतर टीम इंडियाला दुहेरी फटका, आयसीसी क्रमवारीत मोठी घसरण
‘दुर्दैवाने निकाल आमच्या…’, टीम इंडियाच्या पराभवानंतर यशस्वी जयस्वालची प्रतिक्रिया समोर