---Advertisement---

पाकिस्तानात १० वर्षांनी होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे श्रीलंकेचा संघ

---Advertisement---

10 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने आपला संघ घोषित केला आहे. पुढील महिन्यात श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान 2 सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानमध्ये खेळणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेच्या 16 खेळाडूंच्या संघाची घोषणा झाली आहे.

श्रीलंकेने याचवर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिका खेळल्या होत्या.

त्यावेळी श्रीलंकेच्या युवा संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत खूपच प्रेरणादायक कामगिरी केली होती. त्या दौऱ्यात श्रीलंकेच्या दहा वरिष्ठ खेळाडूंनी भाग घेतला नव्हता. यामध्ये मर्यादित षटकांचे कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि लसिथ मलिंगा यांचाही समावेश होता.

पण आता पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या 2  सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंका संघाचे नेतृत्व करुणारत्ने करणार आहे. श्रीलंकेच्या या कसोटी संघात अँजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडिमल यांचा समावेश आहे. तसेच श्रीलंकेच्या संघात कसुन रजिताचाही समावेश करण्यात आला आहे.

मार्च 2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना झालेला नाही. पण आता श्रीलंका संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार असल्याने तब्बल 10 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेट परतणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील कसोटी मालिकेला 11 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना 11 ते 15 डिसेंबरदरम्यान रावळपिंडी येथे होईल. त्यानंतर 19 ते 23 डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना कराची येथे होईल.

या मालिकेसाठी श्रीलंका संघ खालीलप्रमाणे आहे-

दिमुथ करुणारत्ने(कर्णधार), ओशादा फर्नांडो, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, कुसल परेरा, लाहिरू थिरिमन्ने, धनंजय डी सिल्वा, निरोशान डिकवेल्ला, दिलरुवान परेरा, लसिथ अंबुलदानिया, सुरंगा लकमल, लाहिरू कुमार, विश्वा फर्नांन्डो, कसुन रजिथा, लक्षण संदकन.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---