---Advertisement---

इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान समोर संकट वाढलं, महत्त्वाचा खेळाडू झाला जखमी

On: सोमवार, जुलै 20, 2020 10:25 AM
---Advertisement---

मुंबई । पाकिस्तानी फलंदाज खुशदिल शाहने डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला असून ते तीन आठवड्यांपर्यंत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही माहिती दिली. आतापर्यंत फक्त एक टी 20  आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला डावखुरा फलंदाज शाह याला शनिवारी प्रशिक्षण सत्रात अंगठ्याला दुखापत झाली.

पीसीबीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “डार्बी येथे शनिवारी प्रशिक्षण सत्रात डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे डावखुरा फलंदाज खुशदिल शाह तीन आठवड्यांपर्यंत बाहेर राहणार आहे.”

खुशदिल संघातील सदस्यांमधील सध्या सुरू असलेल्या चार दिवसीय सामन्यांचा भाग नसेल आणि 24 ते 27 जुलै रोजी डर्बीमध्ये खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या चार दिवसीय सामन्यासाठीही उपलब्ध होणार नाही.

पीसीबीने सांगितले की, ऑर्थोपेडिक्स, टीम डॉक्टर आणि टीम फिजिओ यांना विश्वास आहे की पुढील आठवड्याच्या अखेरीस तो सराव सुरू करू शकतो. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी पाकिस्तानचा संघ सध्या आपल्या खेळाडूंसह चार दिवसांचा सामना खेळत आहे. इंग्लंड दौर्‍यावर पाकिस्तान तीन कसोटी मालिका आणि तीन टी -20 सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 5 ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---