पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAKvAUS) संघांमध्ये सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. कराचीमध्ये १२ मार्चपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. मूळचा पाकिस्तानी वंशाचा असलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने शानदार दिडशतक झळकावले. तर, स्टीव स्मिथ व ऍलेक्स केरी यांनी अर्धशतके झळकावत पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम ठेवले. मात्र, यादरम्यान पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज साजिद खान (Sajid Khan) याचे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले.
साजिदचे गब्बर सेलिब्रेशन
पहिल्या कसोटीप्रमाणे दुसरी कसोटीदेखील अनिर्णित होण्याच्या दिशेने पहिल्या दोन दिवसात चालली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी यथेच्छ सराव करत ५०५ पेक्षा जास्त धावा काढल्या. त्याचवेळी पाकिस्तानचा फिरकीपटू साजिद खान याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन डावातील १२१ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर साजिद खानने ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रेविस हेडला बाद केले. पंचांनी हेड याला बाद देताच साजिद याने भारताचा सलामीवीर शिखर धवनप्रमाणे सेलिब्रेशन केले. कबड्डीमधील हे सेलिब्रेशन शिखर धवन (Shikhar Dhawan Celebration) झेल घेतल्यानंतर सातत्याने करताना दिसतो. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Sajid Khan Celebration)
Travis Heads back 🚶🏻 @SajidKhan244 gets the breakthrough after lunch!#BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/X9n8Oj6UDv
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 13, 2022
ऑस्ट्रेलियाची शानदार फलंदाजी
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी या सामन्यात शानदार फलंदाजी केली. पहिल्या दोन दिवसात पाकिस्तानी गोलंदाजांना त्यांना सर्वबाद करण्यात अपयश आले. सलामीवीर उस्मान ख्वाजा याने १६० धावांची खेळी केली. त्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथने ७२ तर यष्टीरक्षक ऍलेक्स केरीने ९३ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मिचेल स्टार्क २८ व कर्णधार पॅट कमिन्स ० धावांवर नाबाद आहेत.
महत्वाच्या बातम्या-
बंगळुरूत घोंगावलं पंत नावाचं वादळ! मोडलाय थेट ४० वर्षांपूर्वीचा विक्रम (mahasports.in)