‘मी नेतृत्व करताना कधीही विराट कोहली बनणार नाही, पण एमएस धोनी…’, फाफ डू प्लेसिसचं मोठं वक्तव्य

'मी नेतृत्व करताना कधीही विराट कोहली बनणार नाही, पण एमएस धोनी...', फाफ डू प्लेसिसचं मोठं वक्तव्य

आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने कर्णधारपदाची धुरा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या खांद्यावर सोपवली आहे. विराट कोहलीने आयपीएल २०२१ नंतर कर्णधारपद सांभाळणार नसल्याची घोषणा केली होती. बेंगलोर संघाचा कर्णधार बनण्यापूर्वी डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे. तो सन २०११ मध्ये चेन्नई संघाच्या ताफ्यात सामील झाला होता. तेव्हापासून आयपीएल २०२१ पर्यंत तो धोनीच्याच नेतृत्वात खेळत होता. अशात बेंगलोरचा कर्णधार बनल्यानंतर त्याने स्पष्ट केले आहे की, त्याची आणि धोनीची नेतृत्व करण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. मात्र, नेतृत्व करताना मैदानावर शांत असण्याचा त्यांचा स्वभाव एकसारखाच आहे.

शनिवारी (१२ मार्च) RCB Unbox कार्यक्रमादरम्यान फाफ डू प्लेसिसला (Faf Du Plessis) संघाचा नवीन कर्णधार नेमले होते. यानंतर दिलेल्या मुलाखतीत बोलताना डू प्लेसिस म्हणाला होता की, “मला वाटते की, एमएस धोनी आणि माझ्या नेतृत्वामध्ये साम्य आहे. कारण, आम्ही दोघेही खूप शांत व्यक्तिमत्त्व असलेले व्यक्ती आहोत. पण, कोणत्या परिस्थितीत कसा विचार करायचा, याबाबतीत एमएस धोनी माझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. कारण, माझी शैली दक्षिण आफ्रिकेशी जोडलेली आहे. जेव्हा मी चेन्नई सुपर किंग्स संघाशी जोडलो गेलो, तेव्हा मला जाणवले की, मी जसा विचार करतो, त्यापेक्षा हा व्यक्ती पूर्णपणे वेगळा आहे. मी शिकलो आहे की, वेगवेगळ्या प्रकारे नेतृत्व केले जाऊ शकते.”

“तुमच्याकडे नेतृत्व करण्याची स्वत:ची स्टाईल असणे गरजेचे आहे. कारण, जेव्हाही तुमच्यावर दबाव येईल, तेव्हा याच आधारे विचार कराल. मात्र, मी कधीही विराट कोहली (Virat Kohli) बनण्याचा प्रयत्न करणार नाही. मी एमएस धोनीही (MS Dhoni) बनू शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत, ज्या मला त्यांच्याकडून शिकून माझ्या नेतृत्वाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतील. त्यामुळे या प्रवासासाठी मी आभारी आहे,” असेही पुढे बोलताना डू प्लेसिस म्हणाला.

आयपीएल २०२२मधील साखळी सामन्यांना २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. २७ मार्च रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार आहे.

मंधना-हरमनप्रीत जोडीने जिंकली सर्वांचीच मने, युवराज-सचिनकडूनही कौतुक; पाहा खास ट्वीट्स

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.