टी२० विश्वचषक संपून काही दिवसही सरले नाहीत, तोवर पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उस्मान खान शिनवारीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मंगळवारी (१६ नोव्हेंबर) याबाबात माहिती दिली आहे. उस्मान शिनवारीने आतापर्यंत केवळ एका आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या कसोटी क्रिकेमधून निवृत्तीची माहिती दिली आहे. त्याने पाकिस्तान संघासाठी आतापर्यंत एकूण १७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत, तसेच १६ टी-२० सामने देखील खेळले आहेत.
शिनवारी मागच्या जवळपास दोन वर्षांपासून दुखापतीमुळे पाकिस्तान संघाच्या बाहेर आहे. त्यानंतर त्याने आता हा कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो आता फक्त टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याने मंगळवारी त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून या निर्णयाची घोषणा केली आहे.
त्याने ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले की, “मी फिजिओ जावेद मुगल यांना धन्यवाद करू इच्छितो, ज्यांच्यामुळे मी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकलो. आता मी पूर्णपणे फिट देखील आहे. पण माझे डॉक्टर आणि फिजिओंच्या सल्लानुसार आणि भविष्यात दुखापत होण्यापासून वाचण्यासाठी मी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकार सोडण्याचा निर्णय घेत आहे, ज्यामुळे माझी क्रिकेट कारकीर्द अजून लांब चालू शकेल. मी लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.”
Thanks to @sportsphysiojav ALHAMDULILLAH I have made my comeback again from back injury and now I am absolutely fit but due to my Doctors and physio advises I have to leave Long format to avoid such injuries in future and prolong my Cricket career.I am Resigning from Red ball pic.twitter.com/63gy4J7RKS
— Usman khan shinwari (@Usmanshinwari6) November 16, 2021
शिनवारीने पाकिस्तानसाठी केवळ एका कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले. हा सामना २०१९ मध्ये रावपिंडीत खेळला असून पाकिस्तान संघापुढे या सामन्यात श्रीलंकेचे आव्हान होते. शिनवारीने २०१३ सालल्या डिसेंबर महिन्यात पाकिस्तानसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. असे असले तरी, त्याला पाकिस्तानसाठी त्याचा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी चार वर्ष वाट पाहावी लागली होती.
शिनवारीने खेळलेल्या १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या १७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला त्याने ३४ विकेट्स मिळवून दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एनसीएच्या अध्यक्षपदी वीवीएस लक्ष्मण यांचीच लागणार वर्णी! सनरायझर्स हैदराबादनेही केलीय पुष्टी
बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, ६०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाऐवजी ‘या’ बॉलरची निवड