---Advertisement---

“पाकिस्तानचे खेळाडू वाटतात १७-१८ वर्षाचे पण वास्तवात असतात २७-२८ वर्षांचे” पाकिस्तानी खेळाडूचाच दावा

On: शनिवार, जानेवारी 2, 2021 5:52 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्या ठिकाणी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला आहे. यामध्ये पाकिस्तान संघाला न्यूझीलंडकडून 101 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्याबद्दल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने कामरान अकमलशी चर्चा करताना खेळबळजनक दावा केला आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने कामरान अकमल सोबत एका यूट्यूब चॅनेलवर आताच्या घडीला पाकिस्तान संघात खेळत असणार्‍या पिढीबद्दल चर्चा केली. या चर्चेत मोहम्मद आसिफने पाकिस्तानच्या गोलंदाजाबद्द्ल एक दावा केला आहे की, पाकिस्तान संघाचे वेगवान गोलंदाज फक्त कागदावर तरुण आहेत. मात्र वास्तविकपणे त्यांचे वय जास्त आहे.

मागील पिढीप्रमाणे पाकिस्तान संघाचे आताचे गोलंदाज 20 विकेट्स घेणे आणि कसोटी सामना जिंकण्यात का अपयशी ठरत आहेत ? या प्रश्नावर उत्तर देताना मोहम्मद आसिफ म्हणाला, “मला वाटते 5-6 वर्षे झाली असतील जेव्हा पाकिस्तानच्या कोणत्या वेगवान गोलंदाजाने एका सामन्यात 10 विकेट्स घेतल्या असतील. न्यूझीलंडसारख्या खेळपट्टींना बघून आम्हाला खूप आनंद व्हायचा. वेगवान गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना बाजूला सरकण्याचा कोणता प्रश्नच नव्हता. मला कधीही 5 विकेट्स घेण्याच्या अगोदर चेंडू सोडण्याची सवय नव्हती.”

आसिफ पाकिस्तानच्या गोलंदाजांना म्हणाला वयस्कर 

आसिफ म्हणाला, “या मुलांकडे ज्ञान नाही. त्यांना माहित नाही की, फलंदाजांना पुढच्या पायावर कसे ठेवायचे. त्याचबरोबर धावा न देता यष्टीवर कशी गोलंदाजी करावी. जेव्हा ते यष्टीवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते डाव्या बाजूला जातात. त्यांच्याकडे नियंत्रण नाही.”

आसिफ पुढे म्हणाला,” हे वयस्कर आहेत. कागदावर भलेही ते 17-18 वर्षांचे असल्याची नोंद आहे. परंतु, वास्तवात ते 27-28 वयाचे आहेत. त्यांच्याकडे 20-25 षटके गोलंदाजी करण्याची क्षमता नाही. त्यांना शरीराला कसे वळवायचे माहिती नाही. ते ताठ होवून जातात. ते 5-6 षटके गोलंदाजी केल्यानंतर मैदानावर उभे राहू शकत नाही.”

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघात वेगवान गोलंदाज म्हणून शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद अब्बास सहभागी होते. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंड कडून 101 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

जोर का झटका.! चाहत्याशी जवळीक भारतीय खेळाडूंना भोवली, रोहितसह ‘हे’ ५ जण पुन्हा आयसोलेशनमध्ये

मोठी बातमी! आधी दुर्लक्षित केलेल्या अर्जून तेंडुलकरचा आता मुंबई संघात समावेश

नववर्षाचा शुभारंभ! ‘या’ क्रिकेटरने प्रेयसीसोबत केला साखरपुडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---