टी-२० विश्वचषक स्पर्धा जवळ येऊन ठेपली आहेत. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या या स्पर्धेसाठी संघांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच दोन कट्टर विरोधी संघ भारत-पाकिस्तान यांच्यात वाकयुद्ध सुरू होण्याची चिन्हे आहेत. याला कारण आहे पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम. बाबर आझमचा असा विश्वास आहे, की जेव्हा त्याचा संघ २४ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषक सामन्यात भारताशी सामना करेल, तेव्हा प्रतिस्पर्धी संघावर अधिक दबाव असेल.
रमीज राजा यांना भेटल्यानंतर बाबर म्हणाला, “मला वाटते की, भारतीय संघ विश्वचषक सामन्यात आमच्यापेक्षा जास्त दबावाखाली असेल. आम्ही भारताला पराभूत करून आमची मोहीम सुरू करू इच्छितो.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान हे संघ दुबईत टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पहिल्यांदा आमने-सामने येतील. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहज पराभव केला होता.
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे आणि ५० षटकांच्या विश्वचषकात भारत पाकिस्तानकडून कधीही हरलेला नाही. बाबर म्हणाला की यूएईमध्ये खेळणे आमच्यासाठी घरच्या मैदानावर खेळण्यासारखे असेल.
“हे अगदी आमच्या घरच्या मैदानासारखे आहे, जेव्हा आम्ही यूएईच्या मैदानावर खेळतो, तेव्हा आम्हाला हा एक फायदा मिळतो आणि त्यासोबत आम्ही आमचे १०० टक्के प्रयत्न करु,” असे तो म्हणाला. बाबरने असेही म्हटले आहे की, तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचा कर्णधार होण्यासाठी त्याच्यावर कोणताही दबाव नाही.
त्याच्या या वक्तव्यानंतर भारतीय संघाकडून काय प्रतिसाद येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
उमेशने टाकलेल्या चेंडूने घेतली मलानच्या बॅटची कड अन् रोहितने टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ
युएईमध्ये सर्वाधिक आयपीएल सामने जिंकणारे ५ कर्णधार; रोहित ५ व्या क्रमांकावर
चाहत्यांच्या आनंदासाठी शमीने चालू सामन्यात मैदानावरच कापला केक, पाहा व्हिडिओ