पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच बाबर आझमचा त्याच्या चुलत बहिणीसोबत साखरपुडा झाला असून त्यांचे लग्न पुढीलवर्षी होणार आहे. या लग्नसाठी दोन्हीही कुटुंबानी सहमती दिली आहे. तसेच आझम आणि होणाऱ्या पत्नीनेही या लग्नाला होकार दिला आहे. पाकिस्तानी माध्यमांनीकडून हे वृत्त समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा वरिष्ठ खेळाडू अजहर अलीने आझमला लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अजहर एका चाहत्याच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना म्हणाला होता की, ‘बाबरला आता लग्न केलं पाहिजे’. यानंतर साखरपुडा केल्याने बाबरने अजहरचा हा सल्ला गांभिर्याने घेतला असल्याची चर्चा रंगली आहे.
बाबर आझमवर महिलेने लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप
पाकिस्तानचा कर्णधार आझमवर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार अशी माहिती मिळाली आहे की, आझमने तिला लग्नाचे वचन देऊन तिचे 10 वर्षे लैंगिक शोषण केले होते. ती गरोदर आहे हे समजल्यावर आझमने तिला मारहाण करून त्याच्या काही मित्रांसोबत मिळून तिचा गर्भपात केला होता. पिडीत महिला आणि आझम दोघेही एकाच शाळेत होते आणि दोघांची घरेही जवळच होती.
पिडीत महिलेने सांगितले होते की, “आझमने तिला लग्नाची मागणी घातली होती आणि तिनेही त्याचा स्वीकार केला होता. तेव्हा त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात देखील केली नव्हती.”
So this lady has made accusations against Babar Azam "he promised to marry me, he got me pregnant, he beat me up, he threatened me and he used me"
Video courtesy 24NewsHD pic.twitter.com/PTkvdM4WW2— Saj Sadiq (@SajSadiqCricket) November 28, 2020
बाबर आझमची कामगिरी
बाबर आझम एकदिवसीय आणि टी20 सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करतो. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान बोर्डाने बाबर आझमला कसोटी संघाचाही सामन्याचा कर्णधार बनवले आहे. आतापर्यंत बाबर आझमने 33 कसोटी सामन्यात 42.53 च्या सरासरीने 2169 धावा काढल्या आहेत. त्याने 80 एकदिवसीय सामन्यात 56.84 च्या सरासरीने 3808 धावा केल्या आहेत. याबरोबरच टी20 मध्ये 54 सामन्यात 47.33 च्या सरासरीने 2035 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात भुवनेश्वर कुमारची जागा घेऊ शकतात ‘हे’ ३ गोलंदाज
WTC फायनल: ‘रोहित खेळला तर द्विशतक करुनचं शांत बसेल,’ दिग्गजाला आहे विश्वास
इंग्लंड सरकारचा मोठा निर्णय, दौर्यावर येणार्या भारतीय खेळाडूंना दिली ‘ही’ सूट