पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारुफ हिने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. महिला टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत तिने हा राजीनामा दिला आहे. तिचा हा राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) स्वीकारला.
I have accepted resignation of @maroof_bismah Captain of Pakistan Women’s National Team. She wants to make way for a younger colleague. But happily she will continue to play for Pakistan and bring laurels for her country.
— Najam Sethi (@najamsethi) February 28, 2023
नुकत्याच झालेल्या महिला टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक होती. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आलेले. पाकिस्तानला स्पर्धेत केवळ आयर्लंडला पराभूत करण्यात यश आले होते. मात्र भारत, इंग्लंड व वेस्ट इंडिजकडून त्यांना पराभूत व्हावे लागलेले. तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत पाकिस्तान संघाची कामगिरी संमिश्र राहिलेली. तिच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने 62 टी20 सामने खेळले. त्यापैकी 27 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर, 32 सामन्यात पराभूत व्हावे लागले. तर, तिच्या नेतृत्वातील 34 वनडे सामन्यापैकी 16 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवलेला.
बिस्माह ही पाकिस्तान संघाची प्रमुख अष्टपैलू देखील आहे. ती डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने गोलंदाजी करते. ती पाकिस्तानसाठी वनडे व टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केल्यास, 17 वर्षांच्या कारकिर्दीत तीने 124 वनडे सामन्यात 3110 धावा केल्या आहेत. तर, 132 टी20 मध्ये 1258 धावा तिच्या नावे जमा आहेत.
(Pakistan Captain Bismah Maroof Resign As Captain PCB Accept Resignation)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
थेट ‘सिक्सर किंग’ युवीला पछाडत उमेश ‘स्पेशल’ यादीत! रवी शास्त्रींचा पराक्रमही ध्वस्त
मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची धुरा ‘या’ दिग्गजाच्या हाती, आता रोहितप्रमाणे तीही लावणार विजेतेपदांची रांग