मुंबई । पाकिस्तानची महिला क्रिकेटर बिस्माह मारूफ ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जाते. बिस्माह आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दोन हजार धावा करणारी पहिली पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू आहे.
तिचा 18 जुलै 1991 लाहोर येथे जन्म झाला. आपल्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, तिला दुखापत झाल्याने तिच्या या स्वप्नावर पाणी फेरले गेले.
चीनमध्ये 2010 साली झालेल्या एशियन गेम्समध्ये बांगलादेशला हरवून सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तान संघामध्ये ती होती. 2014 दक्षिण कोरिया येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तान संघाची ती उपकर्णधार होती.
2017 साली यूएई येथे न्यूझीलंडविरुद्ध होणार्या मालिकेपूर्वी तिच्याकडे पाकिस्तान संघाची कमान सोपवण्यात आली. तिच्या नेतृत्वाखाली झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तिने पहिला विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाने 2018 साली दुसऱ्यांदा वनडे मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.
बिस्माहच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी20 विश्वचषकांमध्ये उतरला होता. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्याच्यावेळी तिच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे ती संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली. बिस्माह स्पर्धेबाहेर पडल्यानंतर तिच्या जागी नाहिदा खान हिने संघाची धुरा सांभाळली.
28 वर्षीय या अष्टपैलू खेळाडूने 2006 साली भारताविरुद्ध वनडे सामन्यात खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 108 वनडे सामन्यात आणि 108 टी 20 सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले. वनडे तिच्या नावावर 2602 धावांची नोंद आहे. यासोबत तिने 44 बळी टिपले. टी 20 क्रिकेटमध्ये तिने 2225 धावा केला. यासोबत 36 बळी टिपले.
ट्रेंडिंग घडामोडी –
सोबर्स, बॉथम, कपिल देव यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला बेन स्टोक्स
गांगुली म्हणतो; मला धोनीकडून अशी अपेक्षा नव्हती, त्यादिवशी तो वेगळाच वागला
चाहत्यांनी दादाचा वाढदिवस केला खास अंदाजात साजरा; पाहून व्हाल थक्क