जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात तिसरा सामना आज(14 जानेवारी) पार पडला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 107 धावांनी विजय मिळवला असून तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0ने जिंकत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला आहे.
पाकिस्तानला जरी या सामन्यात पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांचा कर्णधार आणि यष्टीरक्षक सर्फराज खानने खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात दोन्ही डावात यष्टीमागे प्रत्येकी 5 झेल घेतले. त्यामुळे त्याच्या या सामन्यात यष्टीमागे 10 झेल झाले आहेत.
यामुळे तो एका कसोटी सामन्यात यष्टीमागे सर्वाधिक झेल घेणारा यष्टीरक्षक-कर्णधार झाला आहे. हा पराक्रम करताना त्याने भारताच्या एमएस धोनीचा 9 झेलांचा विक्रम मागे टाकला आहे.
धोनीने कर्णधार असताना डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या कसोटी सामन्यात यष्टीमागे 9 झेल घेतले होते. विशेष म्हणजे हा सामना धोनीचा शेवटचा कसोटी सामना होता.
तसेच धोनीने याआधी कर्णधार-यष्टीरक्षक म्हणून एका कसोटी सामन्यात दोन वेळा 8 झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर ऍडम गिलख्रिस्टने जूलै 2004मध्ये श्रीलंका विरुद्ध कर्णधार-यष्टीरक्षक म्हणून 8 झेल घेतले आहेत.
तसेच इंग्लंडचे ऍलेक स्टिवर्ट यांनीही जूलै 1998 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचे नेतृत्व करताना यष्टीमागे 8 झेल घेतले होते.
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे यष्टीरक्षक-कर्णधार:
10 झेल – सर्फराज अहमद (जानेवारी 2019, विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
9 झेल – एमएस धोनी (डिसेंबर 2014, विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
8 झेल – ऍलेक स्टिवर्ट (जूलै 1998, विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
8 झेल – ऍडम गिलख्रिस्ट (जूलै 2004, विरुद्ध श्रीलंका)
8 झेल – एमएस धोनी (जानेवारी 2010, विरुद्ध बांगलादेश)
8 झेल – एमएस धोनी (नोव्हेंबर 2011, विरुद्ध विंडीज)
महत्त्वाच्या बातम्या-
–त्या ६२ धावा हिटमॅन रोहितचे नाव कांगारुंच्या भूमीत सुवर्णाक्षरांनी लिहीणार
–त्या फलंदाजाच्या बाद होण्यावर उभा राहिला मोठा वाद, काय झाले नक्की?
–कांगारूंच्या भूमीत कांगारुंच्या महान खेळाडूचा विक्रम मोडणार रोहित