fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कांगारूंच्या भूमीत कांगारुंच्या महान खेळाडूचा विक्रम मोडणार रोहित

एडलेड | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना उद्यापासून सुरु होत आहे. भारतीय संघ मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे.

पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. परंतु संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

असे असले तरी त्या सामन्यात रोहितने शानदार कामगिरी करताना अनेक विक्रम केले. या सामन्यातही रोहितला अशीच कामगिरी करण्याची संधी आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात जर रोहितने ११० धावा केल्या तर वनडे तो सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १८व्या स्थानी येईल.

सध्या १८व्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मार्क वाॅ आहे. त्याने सलामीला १४१ सामन्यात ४४.०६च्या सरासरीने ५७२९ धावा केल्या होत्या. तर रोहितने ११० सामन्यात ५९.११च्या सरासरीने ५६२० धावा केल्या आहेत.

या यादीत अव्वल स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर असून सचिनने सलामीला ३४४ वनडे सामन्यांत ४८.२९च्या सरासरीने १५३१० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने गमतीने म्हटलेली ही गोष्ट उतरली सत्यात!

आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक

युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…

You might also like