fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

होय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन-डे मालिकेतून संघाबाहेर ठेवले आहे. तसेच त्याची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही निवड झालेली नाही.

पंतला विश्रांतीच्या कारणास्तव वनडे संघात घेतले नाही, असे भारतीय संघनिवड अधिकारी एमएसके प्रसाद यांनी कारण स्पष्ट केले आहे.

“ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने तीन टी20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. यामुळे त्याला आरामाची गरज आहे”, असे प्रसाद यांनी सांगितले.

“पंत एक उत्कृष्ठ यष्टीरक्षक आहे याबाबत काही चुकीचे नाही. मात्र त्याला दोन आठवड्यांची तरी विश्रांती आवश्यक आहे. तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वन-डे विश्वचषकासाठी संघाचा भाग असणार आहे”, असेही प्रसाद यांनी पुढे सांगितले आहे.

कसोटी सामन्यांसाठी दिनेश कार्तिक ऐवजी पंतला घेण्याबाबत काही संघ निवड अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते याचे स्पष्टीकरण प्रसाद यांनी दिले आहे.

“जेव्हा आम्ही पंतला कसोटीमध्ये घ्यायचे ठरवले तेव्हा काहींनी नकारात्मक भुमिका घेतली होती. पण त्याने इंग्लंड विरुद्ध 11 झेल आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध विक्रम करताना आमचा निर्णय योग्य ठरवला. तसेच त्याने फंलदाजीतही उत्तम कामगिरी केली”, असे प्रसाद म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने गमतीने म्हटलेली ही गोष्ट उतरली सत्यात!

आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक

युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…

You might also like