---Advertisement---

आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा

On: सोमवार, ऑगस्ट 21, 2023 1:55 PM
Shahid Afridi
---Advertisement---

सध्या यूएस मास्टर्स टी10 क्रिकेट 2023 खेळली जात आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीसह अनेक माजी दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. आफ्रिदी या स्पर्धेतील न्यूयॉर्क वॉरियर्सचा भाग आहे. गेल्या रविवारी (20 ऑक्टोबर) न्यूयॉर्क वॉरियर्सच्या आफ्रिदीने न्यू जर्सी लीजेंड्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 300 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत सामन्यात नाबाद खेळी केली.

न्यू जर्सी लिजेंड्सविरुद्ध न्यूयॉर्क वॉरियर्स असा सामना रंगला होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने 308.33 च्या स्ट्राइक रेटने 12 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. आफ्रिदीच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याच जुन्या आफ्रिदीची झलक या सामन्यात पाहायला मिळाली. आफ्रिदीच्या या खेळीमुळे संघाला चांगली धावसंख्या उभारता आली, परंतु न्यूयॉर्क वॉरियर्स संघाला विजय मिळवता आला नाही.

आफ्रिदीच्या खेळीचा व्हिडिओ टी10 ग्लोबलने शेअर केला आहे. आफ्रिदी अत्यंत आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “द लाला शो. शाहिद आफ्रिदी, व्वा!”

न्यूयॉर्क वॉरियर्स संघाचा पराभव
पावसामुळे 10 ऐवजी 5 षटकांच्या सामन्यात न्यू जर्सी लीजेंड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना न्यूयॉर्क वॉरियर्सने 5 षटकांत 2 गडी गमावून 84 धावा केल्या. आफ्रिदीने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. धावांचा पाठलाग करताना न्यू जर्सी लिजेंड्सने 4.4 षटकांत १ गडी राखून सामना जिंकला.

संघाकडून सलामीला आलेल्या जेसी रायडरने 12 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. दुसरीकडे, सहकारी सलामीवीर युसूफ पठाणने 6 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 16 धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना क्रिस्टोफर बार्नवेलने 10 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने 28* धावा केल्या. (pakistan captain shahid afridi smashed not out 37 runs in 12 balls )

महत्वाच्या बातम्या-  
IRE vs IND । ‘रिंकू सिंग सगळ्यांचा आवडता’, ऋतुराजचे लक्षवेधी विधान
IRE vs IND । ‘रिंकू सिंग सगळ्यांचा आवडता’, ऋतुराजचे लक्षवेधी विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---