वनडे विश्वचषक 2023 यावर्षी भारतात होणार आहे. या विश्वचषकाची सुरवात 5 ऑक्टोंबरपासून होणार आहे. यात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी 15 ऑक्टोबरला एकमेकांशी भिडतील. हा सामना खेळताना दोन्ही संघावर मोठ्या प्रमाणावर दबाव असणार आहे. याच दबावामुळे पीसीबी पाकिस्तानी संघातील खेळाडूंसाठी संघासह मानसशास्त्रज्ञ भारतात पाठवण्याचा विचार करत आहे.
भारतात होणाऱ्या विश्वचषकसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार आहे. विश्वचषक भारतात असल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनवर खूप दबाव आसणार आहे. हा दबाव कमी करण्यासाठी त्यांच्या सोबत मानसशास्त्रज्ञ पाठण्याचा विचार पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ (Zaka Ashraf) करत आहेत. अश्रफ म्हणाले की, “भारतामध्ये विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाकरीता मानसशास्त्रज्ञांची उपस्थिती गरजेची आहे. कारण ते 2016 नंतर प्रथमच भारताला भेट देत आहेत.” या गोष्टीचा खुलासा पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने केला.
पीसीबीचा अधिकारी पुढे म्हणाला. “पाकिस्तान संघ 2012-13 मध्ये भारत दौऱ्यावर गेला होता तेव्हा देखील संघासोबत मानसशास्त्रज्ञांना पाठवण्यात आले होते. 2011 च्या विश्वचषकासाठी भारताच्या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंनी क्रीडा मानसशास्त्रज्ञांसोबत काही वेळ घलवला होता.”
विश्वचषकात या ठिकाणी खेळणार पाकिस्तान संघ आपले सामने
पाकिस्तान विश्वचषक 2023 चे सामने हैदराबाद, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि अहमदाबाद येथे खेळणार आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन संघात 15 ऑक्टोंबरला अहमदाबाद या मैदानावर लढत रंगणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
विश्वचषाकाआधीच भारत आणि पाकिस्तान आमने सामने
आशिया चषक 2023 ला 30 ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबरला भिडणार आहेत. याआधी, भारत संघाचे 24 ऑगस्टपासून बेंगळुरूमध्ये खेळाडूंसाठी शिबिर आयोजित केले जाईल. आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. (pakistan considering sending psychologist to india for world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आशिया चषक 2023 स्पर्धेतील 13 सामन्यांच्या वेळा निश्चित, वाचा किती वाजता खेळले जाणार सामने
पीसीबीचा ऐतिहासिक निर्णय! पाकिस्तानी खेळाडूंचा पगार चार पटींनी वाढणार, ‘हे’ स्टार क्रिकेटर होणार मालामाल