आशिया चषक 2023साठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. आशिया चषक 2023 हा 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळचे संघ 30 ऑगस्टला आमनेसामने असतील. यानंतर भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ 2 ऑक्टोंबरला भिडतील.
भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबरला आशिया कप 2023 मध्ये आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानचा हा दुसरा सामना असेल. याआधी पाकिस्तानचा संघ नेपाळशी पहिला सामना खेळणार आहे. मात्र, भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्याचबरोबर आशिया चषक 2023चा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ
अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान आगा, टी. ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नादिर शाह, शाहीन आफ्रिदी.
भारतीय संघ खेळाडूंच्या शोधात
दरम्यान भारतीय संघाची आशिया चषकसाठी सध्या अधिकृत घोषणा झालेले नाही. भारतीय संघाच्या अनेक दिग्गज खेळाडूंना दुखापत असल्याने ते अनेक दिवसांपासून संघाच्या बाहेर आहेत. या कारणाने संघात आशिया चषकासोबत विश्वचषकासाठी नविन खेळाडूंचा शोध चालू आहे.
विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ 14 ऑक्टोबरला आमनेसामने असतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे. हा सामना आधी 15 ऑक्टोंबर रोजी होणार होता. परंतू नंतर वेळापत्रक बदलण्यात आले. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक 2023 सुरू होत आहे. तर विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. (pakistan cricket announce squad for asia cup)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विश्वचषकाआधीच केएल राहुल दिसणार मैदानात
“मी नक्कीच तुम्हाला वर्ल्डकपमध्ये दिसणार”, कार्तिकच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया