भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केएल राहुल लवकरच बंगळुरूमध्ये सराव सामना खेळताना दिसणार आहे. भारतीय चाहत्यांव्यतिरिक्त राहुलचा फिटनेस भारतीय संघ व्यवस्थापनासाठी दिलासा देणारी बातमी आहे. आशिया चषकसाठी राहुलची निवड जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
केएल राहुल (KL Rahul) अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याला आयपीएल 2023 मध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानावर दिसला नाही. पण आता भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खेळवली जाणार आहे. त्यानंतर 8 ऑक्टोंबरला विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरवात होणार आहे.
विश्वचषकापूर्वी केएल राहुल आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उभय संघाची मधली फलंदाजी सतत निराशाजनक ठरत आहे. विशेषता पाच नंबरच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने पाचव्या क्रमांकावर अनेक खेळाडूंचा प्रयत्न केला. परंतू, एकही खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्याचबरोबर असे मानले जात आहे की, केएल राहुल व्यतिरिक्त श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखिल आशिया चषकसाठी पुनरागमन करू शकतो.
आशिया चषक 2023चे सुरवातीचे सामने
30ऑगस्ट- पाकिस्तान विरुद्ध नेपाळ
31 ऑगस्ट- बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
02 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध भारत
03 सप्टेंबर- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
04 सप्टेंबर- भारत विरुद्ध नेपाळ
05 सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (kl rahul is set to play asia cup 2023 and world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: वर्ल्डकप वेळापत्रकात मोठा बदल, तब्बल इतके सामने झाले रिशेड्यूल
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर शिखर धवनच्या वक्तव्याने उडाली खळबळ, म्हणाला वर्ल्डकप हारलो तरी..