भारतात होणाऱ्या विश्वचषक 2023 पूर्वी भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धेत भाग घ्याचा आहे. ही स्पर्धा 30 ऑगस्टला सुरू होऊन 17 सप्टेंबरला स्पर्धेचा शेवटचा सामना खेळला जाईल. आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान हे 2 सप्टेंबरला आमने सामने असनार आहेत. या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सोबतच भारतीय संघाचा सलामवीर शिखर धवन याने या सामन्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
स्टार स्पोर्ट्सवर शिखर धवन (Shikhar Dhawan) भारत आणि पाकिस्तान संघांमधील प्रतिस्पर्धेबद्दल बोलताना म्हणाला की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंवर खूप दडपण असते. भारतीय संघाच्या चाहत्यांची इच्छा आहे की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानकडून हरू नये. विश्वचषक जिंकला नाही तरी चालेल परंतू पाकिस्तानविरुद्ध जिंकणे महत्त्वाचे असते. असे नेहमीच घडत आले आहे.”
पुढे धवन म्हणाला, “आशा आहे की देवाच्या कृपेने आम्ही जिंकू. ज्या ज्या वेळी मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो, तेव्हा आम्ही जिंकलो. भारत आणि पाकिस्तान सामन्यात मैदानावर तणावाचे वातावरण असते. परंतू त्यांच्याशी थोडेफार संभाषणही होत असते.”
https://www.instagram.com/reel/CvpffGqqiMK/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
धवनचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या 7 वनडे सामन्यांमध्ये 380 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 54.28 होती तर स्ट्राईक रेट 102 होता. भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन सध्या संघाचा भाग नाही. संघात युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. कधीकाळी रोहित शर्मा सोबत सलामवीर म्हणून भारतीय संघाची थाटात सुरवात करणारा धवन जवळपास वर्षभर भारतीय संघाच्या बाहेर आहे. या महान फलंदाजाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना बांगलादेशविरुद्ध 10 डिसेंबर 2022ला खेळला होता. (shikhar dhawan big statment on india vs pakistan ucoming asia cup 2023 match )
महत्वाच्या बातम्या-
नादच खुळा! शुबमन गिलची वनडे रँकिंगमध्ये गरुडझेप, टॉप 5 फलंदाजांमध्ये एकटाच भारतीय
कुलदीपचा भीमपराक्रम! 3 विकेट्स घेताच मोडून टाकला चहलचा ‘हा’ मोठा Record, लगेच वाचा