१५ ऑगस्ट २०२० रोजी भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. कुणालाही त्याच्या निवृत्तीची कल्पना नसल्यामुळे सर्वजण धोनीच्या निवृत्तीची बातमी ऐकून दंग राहिले. चाहत्यांपासून ते क्रिकेटपटूपर्यंत सर्वांनी धोनीला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यामध्ये पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंचाही समावेश होता. धोनीच्या निवृत्तीनंतर शोएब अख्तर, आमिर सोहेल आणि सकलेन मुश्ताक यांनी धोनीच्या नेतृत्वाची आणि त्याच्या क्रिकेटमधील योगदानाची प्रशंसा केली होती. पण, त्या तिघांनी केलेली प्रशंसा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीला आवडली नाही. Pakistan Cricket Board Gets Angry On Saqlain Mushtaq Due Dhoni Statement
मुश्ताक हे पीसीबीच्या उच्च कार्यक्षमता केंद्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडू विकास केंद्राचे प्रमुख आहेत. पीसीबीने मुश्ताकला म्हटले की, “ते क्रिकेट बोर्डाचा एक कर्मचारी आहे. त्यांनी धोनीची प्रशंसा केलेले बोर्डाला आवडले नाही. त्यामुळे ते असे व्हिडिओ यूट्यूबवर टाकू शकत नाहीत. त्यांनी धोनीच्या निवृत्तीनंतर त्याला फेअरवेल सामना न दिल्यामुळे बीसीसीआयवर टीका केली होती. तसेच, ते भारतीय क्रिकेट प्रकरणांमध्येही हस्तक्षेप करताना दिसतात. त्यांच्या या सर्व गोष्टी बोर्डाला पटत नाहीत.”
मुश्ताकने धोनीसंबंधीचा व्हिडिओ आपल्या यूट्याूब चॅनलवर टाकल्यानंतर पीसीबीने उच्च कार्यक्षमता केंद्र आणि प्रांतीय संघांच्या सर्व प्रशिक्षकांना असे पाऊल न उचलण्याची चेतावणीदेखील दिली होती. पीसीबीने यापुर्वीही भारत आणि पाकिस्तान देशांमध्ये असणाऱ्या राजकीय तणावामुळे पाकिस्तान संघातील खेळाडूंना भारतीय क्रिकेटपटूंविषयी कसलीही प्रतिक्रिया न देण्याचा सल्ला दिला होता.
मुश्ताक यांनी धोनीच्या निवृत्तीनंतर त्यांच्या यूट्यूब चॅनलवर म्हणले होते की, “बीसीसीआय धोनीसारख्या मोठ्या खेळाडूंसोबत योग्य रितीने वागत नाहीत. धोनीची अशाप्रकारे निवृत्ती मिळायली पाहिजे नव्हती. मी अगदी मनापासून असे म्हणत आहे. मी बीसीसीायची क्षमा मागतो, पण तुम्ही धोनीसोबत चांगले वागला नाहीत. मला खूप दुख झाले.”
महत्त्वाच्या बातम्या –
नुकतेच २६७ धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाच्या वडिलांविषयी पसरली अफवा, खरं काय ते घ्या जाणून
अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय गोलंदाज म्हणतोय, माझी बायकोसुद्धा आहे या अवॉर्डची दावेदार
अश्विन पाँटिंगसोबत फोनवर नेमकं काय बोलला? यावेळी होणार खुलासा
ट्रेंडिंग लेख –
४४ वर्षांपूर्वी होल्डींगने असा काही थ्रो केला की दोन्ही बाजूच्या स्टंपवरील उडाल्या होत्या बेल्स
दोन दुर्दैवी फलंदाज जे आयपीएलमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
या खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी, तीन भारतीयांचाही समावेश