मुंबई । पाकिस्तानचा खेळाडू दानिश कनेरिया याने पीसीबीकडे त्याच्यावर लावण्यात आलेली बंदी मागे विनंती केली होती. मात्र पीसीबी त्याच्या विनंतीला दाद देत नाही. दानिश कनेरियाला क्लब क्रिकेट किंवा स्थानिक सामन्यांमध्ये पुनरागमन करायचे आहे. यासाठी आपल्यावर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेण्याची विनंती तो पीसीबीला वारंवार करत आहे.
दरम्यान पीसीबीने ईसीबीकडे अपिल करण्याचा सल्ला दानिश कनेरिया दिला आहे. 2012 साली ईसीबीने मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर आजीवन प्रतिबंध घातला आहे. त्यानंतर पीसीबीने देखील ईसीबीची शिक्षा कायम ठेवली आहे. आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने बंदी मागे घ्यावी अशी विनंती दानिश कनेरिया पीसीबीकडे करत आहे.
दानिश कनेरिया हा पाकिस्तान संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटर आहे. त्याने आपल्या कार्यकीर्दीत पाकिस्तानकडून खेळताना 61 कसोटी सामन्यात 261 बळी घेतले तर 18 वनडे सामन्यात 15 बळी टिपले. 2012 काऊंटी क्रिकेटमध्ये मॅच फिक्शनमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन प्रतिबंध घालण्यात आला.
कनेरियाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून मदत मागितली होती. कनेरिया सोबत दोषी आढळले इतर दोन क्रिकेटपटूंची शिक्षा पीसीबीने माफ केली आहे. त्यांनी क्रिकेट खेळण्यास पुन्हा सुरुवात केली.