---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट रसातळाला! 3 महिन्यांत झाले 3 लाजिरवाणे पराभव

On: सोमवार, ऑगस्ट 26, 2024 10:03 AM
---Advertisement---

एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा राखणारा पाकिस्तानचा क्रिकेट संघ गेल्या काही महिन्यांपासून रसातळाला गेला आहे. अलिकडच्या काही महिन्यांत संघाला अनेक मानहानिकारक पराभवांना सामोरं जावं लागलं. या काळात पाकिस्तानच्या नावे असे काही लाजिरवाणे रेकॉर्ड नोंदल्या गेले, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या अशाच काही विक्रमांबद्दल सांगणार आहोत.

बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी पराभव – नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्ताननं एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला. रावळपिंडी येथे बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत संघाचा 10 गडी राखून पराभव झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहास बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिलाच पराभव आहे. विशेष म्हणजे, या कसोटी सामन्यात डाव घोषित करून देखील पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की आली.

टी20 विश्वचषकात अमेरिकेकडून पराभव – टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानला नवख्या अमेरिकेविरुद्ध धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. पहिला विश्वचषक खेळत असलेल्या अमेरिकनं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभव केला. हा पराभव पाकिस्तानसाठी अतिशय लाजिरवाणा होता, कारण टी20 विश्वचषकात सहयोगी देशाविरुद्ध पराभवाचा सामना करण्याची ही संघाची पहिलीच वेळ होती.

आयर्लंडविरुद्ध टी20 मध्ये पराभव – टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा मानहानिकारक पराभव झाला. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का होता, कारण हा टी20 क्रिकेटमध्ये आयर्लंडनं पाकिस्तानला प्रथमच पराभूत केलं होतं. यापूर्वी 2009 मध्ये पाकिस्ताननं उभय संघांमधील सामना जिंकला होता. मात्र यावेळी आयर्लंडनं पाच गडी राखून विजय मिळवत इतिहास रचला.

हेही वाचा – 

कॅरेबियन पॉवर! रोमॅरियो शेफर्डसमोर वर्ल्ड कप उपविजेता संघ ढेपाळला
पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीला राग अनावर, संघाला कानपिचक्या देत म्हणाला…
बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघातून बाहेर होणार ‘हे’ ३ खेळाडू! आझमचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---