शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला पार पडला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानला सहजरीत्या पराभूत केले. बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. अशात त्यांची विश्वचषकातील विजयाची हॅट्रिकही चुकली. मात्र, भारताकडून मिळालेला हा पराभव पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर यांच्या घशाखाली उतरला नाही. त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आर्थर?
खरं तर, मिकी आर्थर (Micky Arthur) यांनी बीसीसीआयवर टीकास्त्र डागले आहे. त्यांनी म्हटले की, “आज रात्री असे वाटतच नव्हते की, ही कोणती आयसीसी स्पर्धा आहे. असे वाटत होते की, जशी ही बीसीसीआयने भरवलेली स्पर्धा आहे. यादरम्यान ‘दिल दिल पाकिस्तान’ ऐकू येत नव्हते.”
Though it should not be an excuse for such a poor performance against India by Pak team.
But someone said this was job of chairman PCB Zaka Ashraf to say it when India denied visas to Pakistanis who wanted to go to India to enjoy game and support team.
Well Micky Arthur showed… pic.twitter.com/iGumWJtMIE— Rauf Klasra (@KlasraRauf) October 14, 2023
त्यांनी यावेळी असेही स्पष्ट केले की, “आम्ही ही गोष्ट कोणतेही निमित्त म्हणून वापरणार नाहीत.” असे असले, तरीही आता आर्थर यांचे हे विधान जोरदार व्हायरल होत आहे. या विधानावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Mickey Arthur said, "It didn't seem like an ICC event tonight, it seemed like a BCCI event. I didn't hear 'Dil Dil Pakistan' coming through the mics too often. I won't use this as an excuse". pic.twitter.com/uDpZqmYUI5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
पाकिस्तान संघाचा नेट रनरेट घसरला, तर भारत अव्वलस्थानी
हा सामना जिंकत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या सेनेने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील सलग तिसरा विजय साकारला. तसेच, पाकिस्तानला विश्वचषकातील पहिल्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. पाकिस्तान संघाने विश्वचषकात भारताला कधीच पराभूत केले नाहीये. याव्यतिरिक्त भारतीय संघाने या विजयानंतर गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले आहे. भारताने 3 सामन्यांनंतर 6 गुण मिळवले आहे. तसेच, न्यूझीलंड संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. विशेष म्हणजे, न्यूझीलंडचेही 3 सामन्यांनंतर 6 गुण आहेत. मात्र, नेट रनरेट (+1.821) जास्त असल्यामुळे भारत अव्वलस्थानी विराजमान आहे. तसेच, दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानी आहे. यानंतर पाकिस्तान संघ चौथ्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट -0.137 झाला आहे. (Pakistan cricket team director mickey arthur reaction india vs pakistan match world cup 2023)
हेही वाचा-
Video: दारुण पराभवानंतर बाबर बनला ‘किंग कोहली’चा फॅन, भारतीय दिग्गजाकडून जर्सीवर घेतला ऑटोग्राफ
पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच भारताने हलवलं न्यूझीलंडचं सिंहासन, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; टाका नजर