आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 11वा सामना पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस येथे हा सामना रंगणार आहे. पाकिस्तान संघाची धुरा बाबर आझम (Babar Azam) सांभाळताना दिसणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाबर आझमकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. नंतर त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
परंतु पाकिस्तानमधील एका टीव्ही डिबेटमध्ये पाकिस्तान संघातून बाहेर असलेल्या अहमद शहजादला (Ahmed Shehzad) प्रश्न विचारण्यात आला की, आंतरराष्ट्रीय संघात खेळाडूंची निवड करताना बाबर आझम (Babar Azam) पक्षपात करतो का? यावर शाहजादनं तिखट उत्तर दिलं.
अहमद शहजाद (Ahmed Shehzad) म्हणाला, “बाबर आजम (Babar Azam) विषयी बोलायचं झालं तर इथं मैत्रीचा विषय आहे. तो बऱ्याच खेळाडूंना सोबत घेऊन जात आहे. जे खेळाडू बऱ्याच दिवसांपासून चांगल्या फाॅर्ममध्ये नाहीत. हे दृश्य चांगले दिसत नाही. मी सामन्यांची संख्या मोजली तर तुम्हाला कळेल की, किती खेळाडूंना एवढ्या दिवस संधी मिळत नाही.” अहमद शहजादनं (Ahmed Shehzad) पाकिस्तानसाठी 13 कसोटी, 81 एकदिवसीय आणि 59 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
पुढे बोलताना तो म्हणाला, “आम्ही द्विपक्षीय मालिका जिंकण्यासाठी क्रिकेट खेळत नाही, तर आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी खेळतो. गेल्या 4-5 वर्षात आपण एकही स्पर्धा जिंकली आहे का? आम्ही जिंकलो नाही, तर मी म्हणेन की, ही टोळी, मैत्री आहे. जी गेल्या 4-5वर्षांपासून लोकांची दिशाभूल करत आहे. बाबरने कोणतीही स्पर्धा किंवा कोणतीही मोठी मालिका जिंकली नाही, तरीही त्याला कर्णधारपद देण्यात आले. जसा काही तो एमएस धोनी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या गोलंदाजीपुढे आयर्लंडचे खेळाडू ढेपाळले! भारतासमोर अवघ्या 97 धावांचं आव्हान
भारतानं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी, आकाश चोप्रानं केलं जडेजाबद्दल वक्तव्य म्हणाला, “भारतीय संघाची सर्वात…”