क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ हा बोहल्यावर चढला आहे. त्याने त्याची वर्गमैत्रीण मुजना मसूद हिच्यासोबत संसार थाटला आहे. मुजना आणि हॅरिस बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतात. अशात त्यांनी एकसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनंतर हॅरिसवर सोशल मीडियामार्फत शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोण आहे मुजना मसूद?
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) याची पत्नी मुजना मसूद (Muzna Masood) ही पेशाने मॉडेल आहे. तसेच, तिने हॅरिससोबतच शिक्षण घेतले होते. दोघेही एकाच वर्गात होते. मागील काही दिवसांपासून ते एकत्र दिसले होते. यानंतर आता दोघांच्या लग्नाच्या बातम्या येतायेत, ज्यावर या दोघांनीही शिक्कामोर्तब केले आहे. हॅरिस रौफ याच्या लग्नात शाहिद आफ्रिदी आणि त्याचा होणारा जावई शाहीन आफ्रिदी हादेखील सामील झाला होता. हॅरिसच्या लग्नाचा समारंभ 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे.
https://twitter.com/warrashot/status/1606613290410717185
https://twitter.com/Javkhan17/status/1606598588280508416
https://twitter.com/jiyaa_aj/status/1606622551978958849
टी20 आणि वनडेत हॅरिसने केली धमाल
हॅरिस रौफ याने पाकिस्तानकडून खेळताना टी20 आणि वनडेत धमाल केली आहे. त्याने आतापर्यंत 57 टी20 सामन्यात 72 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. यासोबतच त्याने 15 वनडेत 29 विकेट्सही घेतल्या आहेत. मात्र, कसोटीत त्याला खास कामगिरी करता आली नाहीये. त्याने फक्त 1 कसोटी सामना खेळला आहे. यात त्याला फक्त 1 विकेट घेण्यात यश आले. रौफ त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर आरोप लावले होते, त्यामुळे त्याला निलंबितही केले होते. त्यानंतर त्याने त्याच्या गोलंदाजी ऍक्शनमध्ये सुधारणा करत दमदार पुनरागमन केले. हॅरिस टी20तील खूपच चर्चेत आणि यशस्वी खेळाडू आहे.
टी20 विश्वचषक 2022दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) याने हॅरिसला दोन चेंडूवर दोन षटकार मारले होते. तसेच, सामना पालटला होता. यानंतर हॅरिसवर जोरदार टीका झाली होती. (pakistan cricketer haris rauf married to his classmate muzna masood malik know about her)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मित्र कोट्याधीश बनताच ख्रिस गेलने मागितली जुनी उधारी; पूरनला म्हणाला, ‘आता तरी…’
हे काय चाललंय भावा! विराटमुळे एकाच षटकात फलंदाजाला दोनदा मिळाले जीवदान, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण






