सध्या भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी लंडनमध्ये आहे. यावेळी चाहत्यांनी त्याच्याभोवती घेराव टाकला आहे. धोनीचे चाहते जगभर आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो फक्त आयपीएलचे (इंडियन प्रीमियर लीग) सामने खेळतो. त्यातच धोनीला भेटण्याची संधी कोण सोडत नाही. मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात त्याची प्रचिती आली आहे.
मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकात हॅरिस रऊफ (Haris Rauf) हा उत्तम कामगिरी करत चर्चेत आला होता. या स्पर्धेत पाकिस्तानने सुपर १२मध्ये आपले वर्चस्व ठेवले होते, मात्र त्यांना पुढे जाता आले नाही. या स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात षटकांमध्ये २५ धावा देत १ विकेट घेतली होती. या सामन्याच्या काही दिवसांनंतरच हॅरीसने एमएस धोनी (MS Dhoni) कडे जर्सीची मागणी केली होती. त्याला ती मिळाली असून या जर्सीचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत धोनीचे आभार मानले आहे. धोनी २०२१च्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा मेंटर होता. ही जर्सी त्याला कशी मिळाली याचे हॅरीसने स्पष्टीकरण दिले आहे.
हॅरीसने ‘द ग्रेड क्रिकेटर’ या पॉडकास्टमध्ये धोनीच्या जर्सीचा उलगडा केला आहे. त्याने म्हटले, “माझी मागील वर्षी टी२० विश्वचषकाच्या सामन्यानंतर धोनीशी भेट झाली होती. त्यावेळी मी त्यांना त्याची एक जर्सी मागितली होती. मात्र मी त्याला भारतीय संघाची नाही तर चेन्नई सुपर किंग्जची (सीएसके) जर्सी मागितली. नक्कीच मला ती जर्सी पाठवणार असे त्यांनी म्हटले होते. जेव्हा मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होतो तेव्हा मला हवी असलेली जर्सी मिळाली.”
The legend & capt cool @msdhoni has honored me with this beautiful gift his shirt. The "7" still winning hearts through his kind & goodwill gestures. @russcsk specially Thank you so much for kind support. pic.twitter.com/XYpSNKj2Ia
— Haris Rauf (@HarisRauf14) January 7, 2022
या स्पर्धेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिसने उत्तम कामगिरी केली आहे. त्याला २०१८-१९मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेटबॉलरची संधी मिळाली होती. या २८ वर्षीय या खेळाडूने पुढे म्हटले, एका सत्रामध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. याविषयी त्याने म्हटले, “मी नेटमध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली यांना गोलंदाजी केली आहे. तेव्हा हार्दिकही गोलंदाजी करत असे. त्यादरम्यान तो मला मी चांगली गोलंदाजी करत असून माझे राष्ट्रीय संघात नक्कीच पदार्पण होईल असे म्हटले होते.”
हॅरिसने जानेवारी २०२०मध्ये पाकिस्तान संघात पदार्पण केले होते. त्याने १३ वनडे सामन्यात २३ तर ३५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
SLvsPAK: शेन वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ची पुनरावृत्ती! श्रीलंकेच्या फलंदाजाला केले त्रिफळाचीत
“रोहितनंतर रिषभच असेल टीम इंडियाचा कॅप्टन”; दिग्गजाने आजच केले शिक्कामोर्तबच
श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”