पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हक याची मानापासून इच्छा आहे की, त्यांच्या संघाचा कर्णधार बाबर आजमने भारतीय दिग्गज विराट कोहलीपेक्षा चांगले प्रदर्शन करावे. इमामला वाटते की, बाबरने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये विराटपेक्षा जास्त धावा कराव्यात. सध्या बाबर आजमच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० च्या आसपास धावा आहेत. असे असले तरी, विराटला मागे टाकायचे झाल्यात बाबरला अजूम मोठा टप्पा पार करायचा आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. परंतु सध्या तो खराब फॉर्ममध्ये आहे. विराटने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये आतापर्यंत २०,००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. बाबर आजम (Babar Azam) याच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत विराटपेक्षा अर्ध्याच धावा केल्या आहेत.
पाकिस्तान संघाचा युवा फलंदाज इमाम उल हक (Imam-ul-Haq) बाबरविषयी बोलताना म्हणाला की, “विराट कोहली एक दिग्गज आहे आणि यात काहीच शंका नाहीये. जर कोणी २४० पेक्षा अधिक सामने खेळले असतील आणि एखाद्याने ८०, तर तुम्ही त्यांची तुलना करू शकत नाही. जर तुम्हा त्यांच्या कारकिर्दीची तुलना केली, तर बाबर खुप पुढे आहे. पण मला मनापासून वाटते की, माझा सर्वात चांगला मित्र आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबरने येणाऱ्या काळात विराट कोहलीचे सर्व विक्रम मोडावे.”
“सद्या या दोघांची तुलना होऊ शकत नाही. एकाकडे १०,००० पेक्षा जास्त धावा आहेत. होय, मला वाटते की, बाबरने त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी प्रत्येक प्रकारात विराटपेक्षा ३-४ हजार धावा जास्तच कराव्या,” असेही इमाम पुढे बोलताना म्हणाला. बाबर आजमने आतापर्यंत ४० कसोटी, ८९ एकदिवसीय आणि ७४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ९९७९ धावांची नोंद आहे.
दुसरीकडे विराट कोहली मात्र त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब काळातून जात आहे. नोव्हेंबर २०१९ नंतर विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आले नाहीये. सध्या तो भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखपातीमुळे तो खेळू शकला नाही, तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या १६ धावा करून बाद झाला. एकदिवसीय मालिका १-१ अशा बरोबरीवर असून मालिकेतील शेवटचा सामना १७ जुलै रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लॉर्ड्समध्ये चमकला चहल! ४ विकेट्स घेत मोडलाय ३९ वर्षे जुना विक्रम, एक नजर टाकाच
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटच्या पंढरीत एकवटले! धोनी अन् रैनाच्या फोटोंनी वेधले लक्ष