पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व पाकिस्तान क्रिकेट संघ सातत्याने वादात असलेले दिसून येतात. मैदानाबाहेर तसेच अनेकदा मैदानावर देखील हे वाद उद्भवताना दिसतात. आता पाकिस्तान क्रिकेट संघ चांगली कामगिरी करत असतानाच पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर मोठे संकट उभे राहताना दिसते आहे.
सध्या पाकिस्तानचा वरिष्ठ क्रिकेट संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्यांनी विजय मिळवला. तसेच नुकत्याच झालेल्या इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या युवा संघाने देखील विजेतेपद पटकावले. या सर्व गोष्टी घडत असतानाच पाकिस्तानचे क्रिकेटपटू त्यांना वार्षिक करारात मिळणाऱ्या रकमेबाबत समाधानी नसल्याचे समजते आहे.
पाकिस्तानच्या एका आघाडीचा वृत्तसंस्थेत दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानच्या खेळाडूंना केंद्रीय करारानुसार जी रक्कम दिली जाते ती पुरेशी नसल्याचे मत काही खेळाडूंनी व्यक्त केले आहे. वरिष्ठ संघाचा श्रीलंका दौरा समाप्त झाल्यानंतर खेळाडू आणि बोर्ड यांच्या दरम्यान बैठकीचे आयोजन होऊ शकते. यामध्ये खेळाडू पीसीबी चे चेअरमन झाका अश्रफ यांच्याकडे कराराची रक्कम वाढवण्याची मागणी करू शकतात. त्यासोबतच महिला संघ देखील या प्रकारची मागणी करू शकतो.
पाकिस्तान संघाला पुढील तीन महिन्याच्या काळात दोन मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. ऑगस्ट महिन्यात ते आशिया चषक खेळणार असून ते स्पर्धेचे यजमान देखील आहेत. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात ते भाग घेतील. या महत्त्वाच्या स्पर्धा आधी हा वाद मिटला नाहीतर, पाकिस्तान क्रिकेटवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
(Pakistan Cricketers Might Be Strike Against PCB Due To Central Contract Money)
महत्वाच्या बातम्या –
“रोहित-विराटची शतके काय कामाची?”, गावसकरांनी निवडसमितीला विचारले धारदार प्रश्न
नव्या हंगामासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्याला नाही मिळाले यजमानपद