पाकिस्तानच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये, 1992 सालच्या विश्वविजेत्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्सांफ पक्षाने बहुमत मिळवले आहे. पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान असणाऱ्या खान यांनी शनिवारी पदाभार स्विकारला.
एका देशाचे पंतप्रधान होणारे खान हे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरले. असे असले तरीही एका खेळाडूने राजकारणात महत्त्वाचे पद सांभाळणे ही काही पहिलीच गोष्ट नाही.
लिबेरियन फुटबॉलपटू जॉर्ज वेह हे जानेवारीतच देशाचे 25वे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी 60 आंतरराष्ट्रीय सामन्यात 22 गोल केले असून फुटबॉलचा उत्कृष्ठ समजणारा बॅलोन डी ओर हा पुरस्कारदेखील मिळवला आहे.
इजिप्तमधील मोनॅकोचे राजकुमार अल्बर्ट दुसरे हे बॉबस्लेंघ विंटर ऑलिंपिकमध्ये पाच वेळा सहभागी झाले आहेत. सर अॅलेक डोग्लास-होम यांनी युनायटेड किंगडमकडून पहिल्या श्रेणीचे क्रिकेट खेळले असून ते ऑक्टोबर 1963 ते ऑक्टोबर 1964 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते.
तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचीही पार्श्वभूमी क्रिकेटची आहे. त्यांनीही व्यवसायिक क्रिकेट खेळले आहे. ते फलंदाज होते तसेच उजव्या हाताने फलंदाजी करायचे.
परंतू त्यांनी एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. हा सामना त्यांनी 1973-74 दरम्यान रेल्वेकडून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स विरुद्ध खेळला. पण या सामन्यात त्यांना एकही धाव करता आली नव्हती. ते शुन्य धावेवर बाद झाले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…
–कसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी