पाकिस्तान संघाचा विश्नचषक 2023च्या साखळी सामन्यात भारताने दारुण पराभव केला होता. हा सामना संपून आता तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु पाकिस्तान संघाच्या पूर्व प्रशिक्षकाच्या मनातून अजूनही ही सल गेलेली नाही. पाकिस्तान संघाचे तत्कालिन प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी त्यावेळी दिल-दिल पाकिस्तान हे गाण न वाजल्याच कारण दिले होते. त्यावेळी त्यांच्या ह्या वक्तव्याबद्दल सगळीकडून त्यांच्यावर टिका झाली होती. पण मिकी आर्थरने आपल्या त्याच वक्तव्याची रीघ धरत पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
भारतीय संघाने विश्वचषक 2023 मध्ये अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात पाकिस्तान संघाचा 7 विकेट्सने पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 42.5 षटकात 191 धावांवर सर्वबाद झाला होता. प्रत्योत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य 30.3 षटकात फक्त 3 विकेट गमावत गाठले.
अहमदाबादमध्ये लोक आमच्या विरोधात होती – मिकी आर्थर
सामन्यानंतर पाकिस्तानी प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आरोप केला होता की भारतामध्ये पाकिस्तानला जराही सपोर्ट मिळाला नाही. इतकच नाही तर स्टेडियम वर ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणे सुद्धा वाजले नाही. यावरुन त्यावेळी आर्थर यांच्यावर खूप टिका झाली होती. अशातच आता पुन्हा एकदा आर्थरने त्याच पद्धतीचे विधान केले आहे. ते म्हणाले, “तो सामना खूप अवघड होता, कारण पाकिस्तानला तिथे अजिबात सपोर्ट नव्हता. पाकिस्तानी खेळाडूंचा आत्मविश्वास फक्त एकाच गोष्टीने वाढतो तो म्हणजे. स्टेडियम पासून हॉटेलपर्यंत त्यांना चाहत्यांचा सपोर्ट. भारतात विश्वचषक सामन्यावेळी आम्हाला असा सपोर्ट कधीच नाही मिळाला. अहमदाबामध्ये तर वातावरण एकदम आमच्या विरोधात होत. आमच्या खेळाडूंनी या गोष्टीच कधीच भांडवल केल नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण मेहनत घेतली.” (pakistan-faced-hostile-environment-in-against-india-during-world-cup-2023-says-mickey-arthur)
दरम्यान, भारताचे विश्वकप 2023 मधील प्रदर्शन अप्रतिम राहिले. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्याआधी सर्व सामने भारतीय संघाने मोठ्या फरकाने जिंकले हाेते. स्पर्धेत भारताला चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसाद देखील जबरदस्त होता.
महत्वाच्या बातम्या
विराट आणि जोकोविच मेसेजवर बोलतात! महान टेनिसपटूने सांगितले विराटसोबत कसे आहेत संबंध?
IND vs AFG: ही तर धोनीची कृपा! सामनावीर ठरल्यानंतर शिवम दुबेने दिले कॅप्टन कुलला श्रेय