टी20 विश्वचषकात रविवारी (9 जून) बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला.
एकवेळी सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या मुठीत होता. मात्र त्यांची मधली फळी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कोसळली आणि पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवानंतर मैदानातून पॅव्हेलियनकडे जाताना पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहचे डोळे भरून आले होते. नसीम खूपच भावूक दिसत होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहवर शेवटच्या 3 चेंडूत 16 धावा काढण्याची जवळपास अशक्यप्राय जबाबदारी आली होती. त्यानं सर्वतोपरी प्रयत्न केलं, परंतु यश मिळाले नाही. त्याने शेवटच्या चेंडूपूर्वी एक चौकार मारला आणि नंतर कट शॉट मारून दुसरी धाव घेतली. मात्र तोपर्यंत भारताचा विजय निश्चित झाला होता. शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंगच्या यॉर्करसमोर तो काहीच करू शकला नाही.
या पराभवानंतर नसीम शाह भावूक होऊन रडू लागला. दोन वर्षांपूर्वी आशिया चषक स्पर्धेत सलग षटकार ठोकून पाकिस्तानला विजयापर्यंत नेणारा नसीम यावेळी मात्र त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. शाहीन आफ्रिदीनं त्याला मिठी मारून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानंही त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्याला धीर दिला.
Heart wrenching for Naseem Shah, he fought bravely till end 💔#PakvsInd #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/jycv45kLSP
— Aamir Saeed Abbasi (@AmirSaeedAbbasi) June 9, 2024
21 वर्षीय नसीम शाहनं या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याच्या अचूक गोलंदाजीपुढे भारतीय संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. नसीमनं 4 षटकांच्या स्पेलमध्ये 5.25 च्या इकॉनॉमीनं 21 धावांत 3 बळी घेतले. त्यानं विराट कोहली, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांना बाद केलं.
महत्त्वाच्या बातम्या –
मोदींचा शपथविधी…पाकिस्तानचा पराभव…अन् जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष! पाहा सुंदर व्हिडिओ
टीम इंडियाच्या पाकिस्तावरील थरारक विजयाचे 3 हिरो, एका खेळाडूचं नाव कोणाच्याच तोंडी नाही
48 चेंडूत 48 धावा हव्या होत्या, 8 गडी बाकी होते; तरीही पकिस्तानचा पराभव! भारतीय गोलंदाजांनी असा फिरवला सामना