---Advertisement---

मोदींचा शपथविधी…पाकिस्तानचा पराभव…अन् जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष! पाहा सुंदर व्हिडिओ

---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान होतं. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्ध 8 सामन्यांतील हा 7वा विजय आहे.

या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी अवघ्या 120 धावांचं लक्ष्य होतं. मात्र त्यांना 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 113 धावाच करता आल्या. एकेकाळी पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. त्यांना 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या आणि 8 फलंदाज बाकी होते. मात्र यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केलं आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

भारताच्या या शानदार विजयानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. लोकांनी सामना संपल्यानंतर मध्यरात्री घराबाहेर पडून आनंद साजरा केला. लोकांच्या या जल्लोषाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक व्हायरल व्हिडिओ जम्मू येथील आहे. व्हिडिओमध्ये चाहते चौकात उभे राहून फटाके फोडून आनंद साजरा करताना दिसत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

आणखी एक व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदूरचा आहे. येथे चाहत्यांनी रात्री 2 वाजता जमून भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. पुण्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत चाहते मोठ्या संख्येनं जमून आनंद साजरा करताना आणि फटाके फोडताना दिसत आहेत. तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---