आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल याला जागा दिली नाहीये. यामुळे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले. मात्र, आता पाकिस्तानातून चहलविषयी तिखट प्रतिक्रिया समोर येत आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने चहलविषयी खळबळजनक भाष्य केले आहे. कनेरियाने म्हटले आहे की, निवडकर्त्यांनी चहलला संघात न घेण्याचा योग्य निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 21 ऑगस्ट) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. या संघात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या नावाचा समावेश नव्हता. चहलला संघात सामील न करण्यामागे कारण सांगितले गेले की, संघात दोन मनगटी फिरकीपटूंना जागा देणे कठीण जात होते, त्यामुळे त्याला निवडले नाही.
कनेरियाची प्रतिक्रिया
अशात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने गरळ ओकली आहे. त्याने चहलविषयी संतापजनक वक्तव्य केले आहे. कनेरियाने त्याच्या युट्यूब चॅनेलवर कुलदीप यादव याला चहलपेक्षा जास्त महत्त्व देण्याविषयी आपले मत मांडले. त्याने म्हटले की, “युझवेंद्र चहल सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यायोग्य नाहीये. तो खूपच अस्थिर राहिला आहे. दुसरीकडे, कुलदीपने नियमितरीत्या विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, मधल्या षटकांमध्ये तो प्रभावी ठरू शकतो. निवडकर्त्यांनी चहलच्या जागी कुलदीपला निवडून योग्य निर्णय घेतला आहे.”
रोहित काय म्हणालेला?
चहलची संघात निवड न झाल्याविषयी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने म्हटले होते की, “संघाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. जर विश्वचषकात चहलची गरज भासली, तर त्याला संघात घेण्याचा प्रयत्न केला जाईल.”
खरं तर, नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर चहल भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्याने खास प्रदर्शन केले नव्हते. त्याची कामगिरीही सरासरी होती. यावर्षी आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात चहलने फक्त 3 विकेट्स घेतल्या आहेत.
आशिया चषक 2023साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव). (pakistan former cricketer right decison to drop yuzvendra chahal from asia cup 2023 squad)
हेही वाचा-
‘मी घाबरलेलो अन् स्वत:ची लाज वाटली होती…’, गंभीरने अखेर ‘तो’ किस्सा सांगितलाच
जो विक्रम जगातील कुठल्याच संघाला जमला नाही, तो पाकिस्तानने दाखवला करून; भारतीय संघ खूपच मागे