टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्ताननं यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आजम खानची निवड केली आहे. त्याला अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळण्याचीही संधी मिळाली. मात्र या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला, ज्यानंतर सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं. त्याच्या फिटनेसवरही सर्वत्र टीका होत आहे.
या दरम्यान पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज उमर अकमल यानं सोशल मीडियावर स्वत:चे दोन फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये उमर अकमलचे सिक्स पॅक्स ॲब्स दिसत आहेत. मात्र मजेदार बाब म्हणजे, त्याच्या खांद्यावर कोणत्याही मसल्स दिसत नाहीत. अकमलनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “कृपया लक्ष द्या! हे त्या लोकांसाठी आहे, ज्यांना वाटतं की मी फिट नाही.”
उमर अकमलच्या या फोटोंवर सोशल मीडिया युजर्स कमेंट करून त्याची मजा घेत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं की, “पाकिस्तान्यांना फोटोशॉप करून मूर्ख बनवणं किती सोपं आहे. ज्या व्यक्तीचे सिक्स पॅक्स ॲब्स आहेत, त्याच्या मसल्स दिसत नाहीत.” एका चाहत्यानं तर चक्क आर्टिफिशियल इंटॅलिजन्सला धन्यवाद दिलं आहे. उमर अकमलचा हा फोटो खरा आहे की फोटोशॉप, याबाबत तोच सांगू शकतो. तुम्ही त्यानं शेअर केलेले फोटो येथे पाहू शकता.
Attention please
This is for those who think i am not fit#Umarakmal #pakispan #Cricket2024 pic.twitter.com/p8Zfd1UDc3— Umar Akmal (@Umar96Akmal) June 11, 2024
34 वर्षीय उमर अकमलनं पाकिस्तानसाठी 2019 मध्ये शेवटचा आतंरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानं पाकिस्तानकडून 16 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 84 टी20 सामने खेळले आहेत. उमर अकमलनं कसोटीमध्ये 1003 धावा, एकदिवसीय मध्ये 3194 धावा आणि टी20 मध्ये 1690 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे कसोटीत 1 आणि एकदिवसीय मध्ये 2 शतकं आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बांग्लादेशच्या खेळाडूचे पंचांवर गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला नवा वाद
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा; म्हणाला, विश्वचषकानंतर संघातील रहस्य उघड करेन
“तुला लाज वाटली पाहिजे”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं शिख धर्माची खिल्ली उडवल्यानंतर हरभजन सिंग भडकला