---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा; म्हणाला, विश्वचषकानंतर संघातील रहस्य उघड करेन

Shahid afridi
---Advertisement---

टी20 विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाची खराब कामगिरी जारीच आहे. पाकिस्तानचा आधी अमेरिकेकडून आणि नंतर भारताकडून पराभव झाला. आता संघ सुपर-8 च्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. यानंतर आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं वर्ल्डकपनंतर संघातील गुपितं उघड करण्याचा दावा केलाय.

सध्या पाकिस्तान संघात कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दाव करण्यात आलाय की, हे दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलतही नाहीत. यावर शाहिद आफ्रिदी म्हणाला की, तो विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेटला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकांचा खुलासा करेल.

‘जिओ न्यूज’वर बोलत असताना शाहिद आफ्रिदीला त्याचा जावई शाहीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की त्याला बऱ्याच गोष्टी माहित आहेत. मात्र तो सध्या मोकळेपणानं बोलू शकत नाही. आफ्रिदी म्हणाला की, तो विश्वचषकानंतर यावर उघडपणे बोलेन. त्यांच्याच लोकांनी या संघाचा नाश केला असल्याचा दावाही आफ्रिदीनं केला आहे.

शाहिद आफ्रिदी पुढे बोलताना म्हणाला की, “मी काही बोललो तर लोक म्हणतील की मी माझ्या सुनेला पाठिंबा देत आहे. मात्र मी तसं करत नाही. जर माझी मुलगी, मुलगा किंवा जावई यांची चूक असेल तर मी त्यांनाही चुकीचं म्हणेन.”

पाकिस्तानचा संघ आज (11 जून, मंगळवार) कॅनडाविरुद्ध विश्वचषकातील त्यांचा तिसरा सामना खेळणार आहे. सुपर-8 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. बाबर आझचचा संघ हा सामना हरला तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसीच्या नियमामुळे झाला बांग्लादेशचा पराभव? पंचांच्या निर्णयानंतर गोंधळ
टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं केला अद्भूत पराक्रम, टीम इंडियाचा विक्रम मोडून रचला इतिहास
“तुला लाज वाटली पाहिजे”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं शिख धर्माची खिल्ली उडवल्यानंतर हरभजन सिंग भडकला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---