सध्या पाकिस्तानात अर्शद नदीमचा (Arshad Nadeem) गाजावाजा आहे. अर्शदनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा अर्शद पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्शदचा पाकिस्तानात सर्वत्र गौरव केला जात आहे. पण या सन्मानादरम्यान, पाकिस्तान सरकारवर (Pakistan Government) हॉकीच्या महान खेळाडूंचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला.
पाकिस्तान सरकारतर्फे अर्शद नदीमच्या (Arshad Nadeem) सन्मानार्थ जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या जेवणाच्या निमंत्रणावर, पाकिस्तान हॉकी संघाचे माजी खेळाडू राव सलीम नाझिम यांनी दावा केला की सरकारने निमंत्रण मागे घेऊन सर्व ऑलिम्पिक चॅम्पियन्सचा अपमान केला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्ट्सनुसार राव सलीम नाझिम म्हणाले “पीएम हाऊसने अनेक हॉकी दिग्गजांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रणे पाठवली होती आणि त्या सर्वांना त्यांच्या आमंत्रणांची पुष्टी करणारे ईमेल प्राप्त झाले. पण शेवटच्या क्षणी, अनेकांना पंतप्रधान सचिवालयाकडून संदेश आला की त्यांना पाहुण्यांची संख्या एडजस्ट करण्यात अडचण येत आहे, म्हणून आमंत्रण मागे घेण्यात आले आहे.”
निमंत्रण मागे घेताच राव सलीम यांनी प्रश्न उपस्थित केला आणि म्हटले की, ऑलिम्पिक चॅम्पियन्सचा सन्मान करण्याचा हा प्रकार आहे का? राव सलीम म्हणाले, “देशासाठी हॉकीमध्ये एक नव्हे तर अनेक ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या अशा खेळाडूंबद्दल तुम्ही आदर दाखवता का?”
2024चे ऑलिम्पिक नुकतेच संपले. या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं (Arshad Nadeem) सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानला भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा अर्शद पहिला खेळाडू बनला. पाकिस्तानला शेवटचे सुवर्णपदक 1983 मध्ये मिळाले होते. जे हाॅकी संघाने जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची ऑलटाइम प्लेइंग-11, हा दिग्गज कर्णधार
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानला धक्का, WTC गुणतालिकेत भारताचा खेळ बिघडला?
गुजरात टायटन्स ‘या’ 3 स्टार खेळाडूंना लिलावापूर्वी करणार रिलीज?