ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात सहभागी होण्यासाठी अखेर पाकिस्तान क्रिकेट संघाला परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी (6 ऑगस्ट) इस्लामाबाद येथे हा निर्णय घेतला. त्यामुळे जवळपास सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा आता समाप्त झाल्या आहेत.
दहा वर्षानंतर भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेले सर्व विश्वचषक भारतीय उपखंडातील दोन किंवा अधिक देशांमध्ये खेळले गेलेले. यावेळी केवळ भारतच स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. असे असताना पाकिस्तान संघ भारतात खेळण्यासाठी येणार का याबाबत शंका निर्माण झाली होती.
दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे दोन्ही देश एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. उभय देशांमध्ये अखेरची द्विपक्षीय मालिका 2013 मध्ये भारतात खेळली गेलेली. त्यानंतर हे दोन्ही देश केवळ विश्वचषक स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात.
ऑगस्ट महिन्यात होणारा आशिया चषक पाकिस्तान आयोजित करणार होता. मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानचा जाण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान व श्रीलंका येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. त्यामुळेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी भारतात येणार नाही अशी भूमिका घेतलेली. मात्र, आयसीसीच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी याबाबतचा अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल असे म्हटले.
त्यानुसार पाकिस्तान सरकारने आपले एक पथक भारतात पाठवून सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर, अखेर पाकिस्तान संघाला भारतात जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता पाकिस्तान संघ या विश्वचषकात सहभागी होण्याचे सर्व मार्ग खुले झाले आहेत.
(Pakistan government has decided to send their team for the World Cup in India)
महत्वाच्या बातम्या-
आगामी टी20 विश्वचषकाबद्दल रोहितने दिली लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाला..
वर्ल्डकपसाठी पाकिस्तानची तयारी सुरू! ‘या’ खास व्यक्तीला केले पाचारण