आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. पण चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या तयारीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) समाधानी आहे. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) स्पर्धेशी संबंधित काम जलद करण्यास सांगितले आहे. पीसीबी अध्यक्ष आयसीसीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दुबईला गेले होते. त्यावेळी त्यांनी कराची, लाहोर आणि रावलपिंडीच्या मैदानात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या वेबसाईट जिओ न्यूजनुसार, आयसीसी (ICC) पाकिस्तानच्या तयारीवर समाधानी आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणारा मेगा इव्हेंट सुरू होण्यापूर्वी मैदाने तयार होतील, असे त्यांना वाटत आहे. नक्वी यांनी आयसीसीला पाकिस्तानला भेट देण्याची विनंती केली आहे. याशिवाय त्यांनी आयसीसीलाच या स्पर्धेची तयारी आणि व्यवस्थेचा आढावा घेण्याची विनंती केली आहे.
पण आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? हे पाहणंदेखील उत्सुकतेचं ठरेल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) प्रमुख रिचर्ड गोल्ड यांनी आधीच दावा केला आहे की, आयसीसी स्पर्धा भारताशिवाय पुढे जाऊ शकत नाही. बीसीसीआयने अद्याप आपला संघ पाठवण्याबाबत कोणतीही पुष्टी केली नाही. भारत सरकारच्या परवानगीनंतरच संघ पाठवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे बोर्डाने सांगितले आहे.
हेही वाचा-
फक्त रिषभ पंतच नाही, तर हे 6 खेळाडू देखील झालेत 99 धावांवर बाद!
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांची यादी (टाॅप-5)
कॉमनवेल्थ गेम्स 2026 साठी मोठा निर्णय, क्रिकेट आणि हॉकीसह या खेळांवर बंदी..!