---Advertisement---

‘टी२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचणार नाही पाकिस्तान संघ’, माजी क्रिकेटरचा घरचा आहेर

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 4:27 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे रविवारपासून (१७ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या टी२० विश्वचषकात पाकिस्तान संघ त्यांचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला भारताविरुद्ध खेळणार आहे. त्यापूर्वी सोमवारी (१८ ऑक्टोबर) पाकिस्तान संघ विश्वचषकातील त्यांचा एक सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज गोलंदाज जलालुद्दीनने त्यांच्या देशाच्या संघाविषयी मोठे विधान केले आहे.

त्यांच्या मते पाकिस्तानच्या विरोधी संघांनी जर काही मोठ्या चुका केल्या नाहीत, तर संघाकडे टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी कोणतीही संधी नाही.

जलाल यांनी रविवारी (१७ ऑक्टोबर) द न्यूजशी केकेल्या चर्चेदरम्यान सांगितले की, ते पाकिस्तानला टी-२० विश्वचषकाच्या सर्वोच्च स्थानासाठी एक मजबूत दावेदाराच्या रुपात पाहत नाहीत. ते म्हणाले, “जेव्हा सर्व संघ त्यांच्या संघांना अंतिम स्वरूप देण्यात व्यस्थ होते, पाकिस्तान क्रिकेट एका झटक्याच्या प्रक्रियेतून जात होता, वरपासून खालीपर्यंत बदल होत होते.”

जलाल पुढे म्हणाले की, “त्यांचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, त्यांचे सर्व सहायक सोडून जात होते, कारण सर्वोच्च स्थानी एक मोठा बदल होता. हे सर्व तेव्हा झाले, जेव्हा टी२० विश्वचषक अवघा महिना लांब होता.”

जललाच्या मते, जर विरोधकांनी चुका केल्या, तर पाकिस्तानने त्याचा फायदा घेतला पाहिजे. “कोणत्याही क्षेत्रात – फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण पाहिल्यावर आपल्याकडे हा टी-२० विश्वचषक जिंकण्याची क्षमता आहे का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

असे असले तरी जलालने एक गोष्ट सांगितली आहे, जी पाकिस्तान संघाची मदत करू शकते, ते म्हणाले की, “एक गोष्ट पाकिस्तानची मदत करू शकते. ते दबावापासून मुक्त असतील, कारण सर्वांनी पाहिले की, आमच्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये कसे प्रदर्शन केले आणि आमचे क्रिकेट प्रशासन कशा बदलांमधून गेले आहे. ते कोणत्याच बाबतीत या आयोजनात दावेदार नाहीत.”

शाहीन शाह अफरिदी, हसन अली, शोएब मलिक आणि मोहम्मद हफीज यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे सर्वक्षेष्ठ खेळावे लागेल. तसेच पाकिस्तान बऱ्यापैकी कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोहेब मकसूदला झालेली दुखापत संघासाठी फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

टी२० विश्वचषकाची पहिली लढत सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेसाठी दुख:द बातमी, दिग्गज कर्णधाराचे निधन

द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यावर एनसीएचा प्रमुख कोण? ‘या’ माजी खेळाडूचा जबाबदारी स्वीकारण्यासाठी नकार

‘पैसाच सर्वकाही आहे, पैसा नसता तर आज मी पेट्रोल पंपवर काम करत असतो,’ पांड्याचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---