---Advertisement---

द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यावर एनसीएचा प्रमुख कोण? ‘या’ माजी खेळाडूचा जबाबदारी स्वीकारण्यासाठी नकार

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 4:10 PM
---Advertisement---

बीसीसीआय सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. अशात बीसीसीआयलाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) प्रमुख पदासाठी देखील नवीन चेहरा शोधावा लागण्याची शक्यता आहे. यामागचे कारण, सध्याचे एनसीए प्रमुख राहुल द्रविड यांची आगामी काळात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांना एनसीए प्रमुख पदासाठी विचारण्यात आले होते, पण त्यांनी या पदासाठी नकार दिला आहे, अशीही माहिती आता समोर येत आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यापूर्वी भारताचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी इच्छुक नसल्याची माहिती समोर आली होती. पण आता बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर द्रविड ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाल्याच्या चर्चा आहेत.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक नियुक्तीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी रविवारी (१७ ऑक्टोबर) जाहिरात प्रसिद्ध केली आणि या पदासाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. असे असले तरी, द्रविडचे नाव या पदासाठी प्रबळ दावेदार आहे.

द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यानंतर एनसीए प्रमुख कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीसीसीआयने माजी दिग्गज क्रिकेटपटू लक्ष्मण यांना एनसीए प्रमुख बनण्यासाठी संपर्क केला होता, पण लक्ष्मणने या पदासाठी नकार दिला असल्याचे समोर येत आहे. लक्ष्मणने या पदासाठी कसलीच इच्छुकता दर्शवली नाही आणि हे पदा स्वीकारण्यासाठी नकार दिला आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि एनसीए प्रमुख यांच्यातील संबंध चांगले असणे एकमेकांसोबतचा ताळमेळही चांगला असणे गरजेचे असते. द्रविड आणि लक्ष्मण हे दोन्ही देग्गज खेळाडू एकाच काळातील असून, या दोघांनीही भारतीय संघासाठी १०० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. अशात बीसीसीआयची इच्छा होती की, द्रविड संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यावर, लक्ष्मणने त्याची जागा घ्यावी आणि एनसीएचे प्रमुखपद सांभाळावे. मात्र, सध्या लक्ष्मणने ही जाबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. आता बीसीसीआयला या पदासाठी नवीन चेहऱ्याचा विचार करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘पैसाच सर्वकाही आहे, पैसा नसता तर आज मी पेट्रोल पंपवर काम करत असतो,’ पांड्याचे मोठे वक्तव्य

टी२० विश्वचषकातील ‘या’ विक्रमावर कोहलीची नजर, जयवर्धनेची ७ वर्षांची बादशाहत उध्वस्त करत बनेल नंबर १

नवा प्रवास, नवे ध्येय; भारताचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर शास्त्री ‘या’ आयपीएल फ्रँचायजीला देणार कोचिंग!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---