पाकिस्तान संघाची 15व्या आशिया चषक (Asia Cup)स्पर्धेत निराशाजनक सुरूवात झाली. रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात भारताने त्यांचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या स्पर्धेत खेळण्यापूर्वीच पाकिस्तानला शाहीन आफ्रिदीच्या रूपात मोठा धक्का बसला होता. तो दुखापतीमुळे या महत्वाच्या स्पर्धेस मुकला. आता पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी बोर्डने जाहीर केली आहे. बोर्डने आफ्रिदीबाबत महत्वाची माहिती सांगितली आहे.
पाकिस्तान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आशिया चषकासाठी तो मुकला असला तरी तो संघासोबत दुबईमध्ये होता. आता त्याला पुढच्या उपचारासाठी लंडनला पाठवले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डला आशा आहे की, त्याने आगामी टी20 विश्वचषकाच्या आधी पूर्णपणे ठिक व्हावे. तो पुढील उपचार आणि रिहॅबिलिटेशनसाठी लंडनला रवाना झाला आहे.
शाहीनला जुलैमध्ये गॉल येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्याने लवकर फिट व्हावे आणि टी20 विश्वचषकात खेळावे अशी आशा व्यक्त केली जात आहे. टी20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये खेळला जाणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध झालेली दुखापत शाहीनला फारच महागात पडली. तो श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना आणि नेदरलॅंड्सविरुद्धच्या वनडे मालिकेतही खेळला नाही. तर तो आशिया चषकातून बाहेर पडल्याने कर्णधार बाबर आजमने निराशा व्यक्त केली होती. तसेच त्याच्या मेडिकल रिपोर्टबाबत पीसीबीचे मुख्य फिजिओ अधिकारी डॉ. नजीबुल्लाह सूमरो यांनी त्याला खास देखरेख करायला लावली होती. त्याचबरोबर त्याला 4-6 आठवडे आरामही सांगितला होता.
“लंडनमध्ये सर्वोत्तम रिहॅबिलिटेशनच्या सुविधा आहेत. यामुळेच शाहीनला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या उपचारादरम्यान आमचा मेडिकल गटही लंडनमध्ये उपस्थित असणार आहे,” असे सूमरो यांनी म्हटले आहे.
शाहीनने 25 कसोटीमध्ये 99 आणि 32 वनडेत 62 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 40 आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमी रेट कसोटीमध्ये 3.04 आणि वनडेमध्ये 5.5 एवढा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराह-शमीची कमतरता आता जाणवणार नाही; भारताचा ‘हा’ गोलंदाज विरोधकांसाठी ‘अकेला ही काफी है!’
लंकादहनानंतर आता बांग्लादेशला नमवायला अफगाणिस्तान सज्ज! पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
‘हार्दिकच्या मॅच विनिंग खेळीची केंद्रीय मंत्रायलयातही चर्चा!’ भाजपच्या मोठ्या नेत्यानी थेट शेअर केलाय व्हिडिओ