---Advertisement---

भारतातच नव्हे पाकिस्तानातही इंडियन्सचे नाव! राहुलसोबतच्या एका फोटोसाठी PAKची महिला पत्रकार उतावीळ

KL Rahul
---Advertisement---

एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) या हायव्होल्टेज सामन्याला आता फक्त काहीच तास शिल्लक आहेत. या महासंग्रामासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंचा चांगलाच सुरू आहे. खेळाडू ज्या मैदानावर सरावाचा अभ्यास करत होते तेथे चाहत्यांनी मोठी गर्दी केली. चाहत्यांनी खेळाडूंसोबत सेल्फी काढल्या. तर काही खेळाडूंनीही सरावानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतही आपली उपस्थिती नोंदवली आहे. केएल राहुलच्या पत्रकार परिषदेमध्ये एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला आहे.

भारतीय खेळाडूंचे चाहते पाकिस्तानमध्येही हे अनेकवेळा दिसले आहेत. काही जण लांबचा प्रवास करून फक्त एशिया कपचे सामने पाहायला नाही तर भारतीय खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठीही आले आहेत. नशीब बलवत्तर अशा काहींना त्यांच्या आवडत्या खेळांडूसोबत भेट घेण्याची संधी तर मिळालीच त्याचबरोबर फोटोही काढता आले आहे. याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. नुकतेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही पाकिस्तानच्या काही चाहत्यांसोबत सेल्फी काढल्या आहेत. तर पाकिस्तानी पत्रकारालाही भारतीय खेळाडूसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

भारताच्या सामन्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानच्या पत्रकारांनी केएल राहुलसोबत सेल्फी घेण्याची विचारणा केली. राहुलनेही त्यांचे मन राखत पाकिस्तानच्या पत्रकारांसोबत फोटो काढले आहेत.

या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध २८ ऑगस्टला आहे. हा सामना दुबई येथे खेळला जाणार आहे.

Why Pak journalist took selfie with Rahul and KOhli fielding session

भारताचा उपकर्णधार-फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर होता. नुकतेच त्याने संघात पुनरागमन करत झिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व केले. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २ शतकेही आहेत. त्याने भारताकडून टी२०च्या ५२ डावांमध्ये १८३१ धावा केल्या आहेत.

पाकिस्तानने त्यांच्या विश्वचषकातील १३व्या प्रयत्नात भारताला पराभूत केले आहे. पाकिस्तानने २०२१च्या टी२० विश्वचषकात भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. त्या सामन्यात वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने भारताची वरच्या फळीला जोरदार धक्का दिला होता. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल या तिघांनाही बाद केले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---