विराट कोहली याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. ते तोडणे कोणत्याही फलंदाजाला सोपे जाणार नाही. कोहलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:चे नाव कमावले आहे. त्याच्यामुळे भारतीय संघाने अनेक महत्त्वाचे सामने जिंकले. याच कारणामुळे कोहलीचे भारताबरोबरच इतर देशांमध्येही फॅन फॉलोइंग आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने कोहलीचे खूप कौतुक केले आहे. विराट या शतकातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे तो म्हणतो.
अख्तरने सचिन आणि कोहलीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही, असे तो म्हणतो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अख्तर म्हणाला, ”विराट हा विराट आहे. तो या शतकातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यावेळी वसीम अक्रमसारख्या गोलंदाजाला खेळवणे सोपे नव्हते. पण असे असतानाही सचिनही धावा केल्या. कोहली आणि सचिनची तुलना होऊ शकत नाही.”
कोहलीने भारतीय संघासाठी आतापर्यंत 113 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत 8848 धावा केल्या आहेत. कोहलीने या फॉरमॅटमध्ये 29 शतके आणि 7 द्विशतके झळकावली आहेत. त्याने 30 अर्धशतकेही केली आहेत. कोहलीने 292 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 50 शतके झळकावली आहेत. तर 72 अर्धशतकेही केली आहेत. यासह 13848 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी 117 टी-20 सामन्यांमध्ये 4037 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 37 अर्धशतके केली आहेत.
कोहली आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी सुरू करणार आहे. यापूर्वी तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी कोहलीला संघात स्थान देण्यात आले आहे. (Pakistan legend turned Kohli fan read why he called Virat the best batsman of the century)
हेही वाचा
PAK vs NZ: पाकिस्तानकडून 5व्या टी20 मध्ये न्यूझीलंडचा मोठा पराभव, विश्वचषकानंतर मिळवला पहिला विजय
‘सानिया त्याच्या विवाहबाह्य…’, शोएब मलिकच्या बहिणीने भावाबाबत केला धक्कादायक खुलासा