Shoaib Malik and Sana Javed Marriage: पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू शोएब मलिक याने शनिवारी (20 जानेवारी) आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आतापर्यंत मलिकने त्याची दुसरी पत्नी सानिया मिर्झा हीला अधिकृतपणे घटस्फोट दिलेला नाही आणि त्याने तिसरे लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 41 वर्षीय मलिकच्या तिसऱ्या पत्नीचे नाव सना जावेद असून ती एक अभिनेत्री आहे. ती पाकिस्तानमध्ये खूप प्रसिद्ध आहे, पण भारतीय चाहत्यांना तिच्याबद्दल फार कमी माहिती असेल.
सना जावेद (Sana Javed) हीचा जन्म 1993 मध्ये सौदी अरेबियामध्ये झाला होता आणि ती मलिकपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. तिने 2012 मध्ये शहर-ए-जात नावाच्या शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर अनेक मालिकांमध्ये काम केले. खनी या रोमँटिक ड्रामामध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर सनाला ओळख मिळाली. सामाजिकदृष्ट्या आधारित रुसवाई आणि डँकमधील तिच्या अभिनयासाठी सनाचे खूप कौतुक झाले आणि त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा PISA पुरस्कार देखील देण्यात आला होता. (who is sana javed pakistan cricketer shoaib malik s third wife)
सनाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी 2020 मध्ये तिने पाकिस्तानी गायक उमेर जसवाल ( Umer Jaswal) याच्याशी कराची येथे एका खाजगी समारंभात लग्न केले. अनेक प्रसंगी 30 वर्षीय अभिनेत्रीचे नाव अनुभवी पाकिस्तानी क्रिकेटरशी जोडले गेले. ज्युनियर आर्टिस्ट आणि मेकअप आर्टिस्टसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असताना मलिक सनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरला होता.
शोएब (Shoaib Malik) मलिकसोबत लग्न केल्यानंतर सनाने इन्स्टाग्रामवर तिच्या बायोमध्ये तिचे नाव सना जावेद मलिक असे लिहिले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानसह भारतातील लोकही आश्चर्यचकित झाले आहेत, कारण मलिक आणि सानियाच्या घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.
41 वर्षीय मलिकने 2002 मध्ये आयशा सिद्दीकी ( Ayesha Siddiqui) हीच्याशी पहिले लग्न केले होते. यानंतर त्याने 2010 मध्ये तिला घटस्फोट दिला आणि माजी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) हीच्याशी लग्न केले, दोघांना एक मुलगा आहे आणि त्याचे नाव इझान आहे. (Who is Shoaib Malik’s third wife Sana Javed for whom the Pakistani cricketer left Sania Mirza)
हेही वाचा
तिसऱ्या लग्नासाठी शोएबने सानियाला दिला घटस्फोट! पण आता मुलागा इजहानचा कोण करणार सांभाळ?
‘तो जगातील सर्वोत्तम…’, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लंड संघ रोहित शर्माला घाबरला