गुरुवार (30 मे) रोजी पाकिस्तान विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये चौथा टी20 सामना खेळला गेला. त्यामध्ये इंग्लंडनं पाकिस्तान संघाचा 7 विकेट्सनं दारुण पराभव केला. पाकिस्तान संघ 4 सामन्यांच्या टी20 मालिकेत एकही सामना जिंकू शकला नाही. पाकिस्तानसाठी इग्लंड आणि आयर्लंड दौरा खूप निराशाजनक राहिला. बाबर आझमच्या संघाच्या हाती फक्त निराशाच लागली. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंडनं 2 सामन्यात विजय मिळवला, तर पावसानं खोळंबा घातल्या कारणाने 2 सामने रद्द करण्यात आले.
पाकिस्तानच्या या इंग्लंड दौऱ्या दरम्यान शेवटचा टी20 सामना लंडनच्या ओवल मैदानावरती खेळला गेला. इंग्लंड संघाने नाणेपफेक जिंकून पाकिस्तान संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्ताननं फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारुन 19.5 षटकात मात्र,157 धावा कुटल्या. पाकिस्तान संघ संपूर्ण ओव्हरसुद्धा खेळू शकला नाही. एक चेंडू बाकी असताना पाकिस्तान संघ सर्वबाद झाला. इंग्लंडनं 158 धावांचा पाठलाग करताना फक्त 3 विकेट्स गमावले. 15.3 षटकात इंग्लडनं 158 धावांच आव्हान गाठलं.
इग्लंड धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फिल साल्टनं 24 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी खेळली. इंग्लंडसाठी त्यानं सर्वाधिक धावसंख्या बनवली. तर संघाचा कर्णधार जोस बटलरनं 21 चेंडूत संघाला 39 धावांच योगदान दिलं. कर्णधार जोस बटलर आणि फिल साल्ट या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 6.6 षटकात 82 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जाॅनी बेयरस्टो 16 चेंडूत 28 धावा तर विल जॅक्स 18 चेंडू 20 धावा आणि हॅरी ब्रूक 14 चेंडू 17 धावा यांच्या जोरावर इंग्लंडनं 158 धावांच लक्ष्य पूर्ण केलं.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफनं 3.3 षटकात 38 धावा देऊनं 3 विकेट्स घेतल्या. तर पाकिस्तानचा इतर कोणताही गोलंदाज सामन्यावर प्रभाव टाकू शकला नाही. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझमनं 36 धावांची खेळी खेळली. उस्मान खान यानं 21 चेंडूत 38 धावांची खेळी केली. तर पाकिस्तान संघाचा इतर कोणताही फलंदाज 25 धावांपेक्ष्या जास्त धावा करु शकला नाही. इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाज मार्क वुड, आदिल राशिद आणि लियम लिविंगस्टन यांनी 2-2 गडी बाद करत संघाला मोलाचं योगदान दिलं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आता नाही तर कधीच नाही’ या तीन भारतीय खेळाडूंना टी20 विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी!
टी20 विश्वचषकाआधीच सुर्यकुमार यादवनं केलं, यशस्वी जयस्वालला सावधान!
भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आईएसआईएस (ISIS) कडून मिळाली धमकी