आशिया चषकाचे वेळापत्रक जाहिर झाल्यापासूनच चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता होती. मुळात हे दोन्ही संघ द्विपक्षीय सामने खेळत नाहीत. अशा परिस्थितीत आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्येच या दोन्ही संघांमध्ये होणारी लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच ही लढत क्रिकेट जगतातील स्रावत लोकप्रिय आणि सर्वाधिक पाहिली जाणारी लढत आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ २८ ऑगस्ट रोजी आशिया चषकाच्या दुसऱ्याच सामन्यात आमने-सामने आले यावेळी भारतीय संघाला ५ विकेट्स राखून विजयमिळवण्यात यश आले. या सामन्यात भारतासाठी हार्दिक पंड्याने अष्टपैलू खेळी करत ३ विकेट्स अन् नाबाद ३३ धावा केल्या. मात्र, पाकिस्तानी संघाचा पराभव मुख्यत्वेकरून क्रिकेटमध्ये नव्याने सामील झालेल्या नियमामुळे झाला असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच आयसीसीने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले. त्यमध्या सामन्यातील ओव्हर्स धीम्या गतीने टाकल्यास वेळेनंतर जितके ओव्हर्स बाकी राहतील तितके ओव्हर्स एक अधिकचा खेळाडू ३० मिटरच्या वर्तूळाच्या आत उभा करावा लागेल. या नियमामुळे पाकिस्तानी संघाला २८ ऑगस्ट रोजी झालेला सामना गमवावा लागला. पाकिस्तानी संघाला ओव्हर्स पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वेळेत पाकिस्तान संग केवळ १७ ओव्हर्स टाकू शकला. त्यामुळे उर्वरित ३ ओव्हर्ससाठी त्यांना एक अधिकचा खेळाडू वर्तूळाच्या आत फलंदाजीसाठी उभा करावा लागला. त्यामुळे फलंदाजी करत असलेल्या हार्दिक पंड्या अन् रविंद्र जडेजा यांना चोकार अन् षटकार लगावणे अधिक सोपे झाले.
दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी खेळवल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याने अष्टपैलू खेळा केली. ज्यामध्ये गोलंदाजीतील ३ विकेट्स अन् लक्ष्याचा पाठलाग करत असताना केलेल्या नाबाद ३३ धावांचा समावेश आहे. ज्याच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धचा पराभव माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या जिव्हारी; म्हणाला, ‘आझमला कॅप्टन का बनवलंय’
तेरा भाई संभाल लेगा..! दबावाच्या क्षणीही दाखवला आत्मविश्वास, हार्दिकचा स्वॅग पाहून चाहते घायाळ
INDvsPAK: तेच मैदान, तेच विरोधक! चार वर्षापूर्वी स्ट्रेचरवर बाहेर गेलेल्या हार्दिकचे जबरदस्त पुनरागमन